Breaking

मंगळवार, २५ ऑगस्ट, २०२०

भाजपा युवा मोर्चा ता.अध्यक्ष पदी सोमनाथ नाना गायकवाड. तर माढा ता. सरचिटणीस पदी मदन मुंगळे व डी एम मोरे यांची निवड*

.
.


*भाजपा युवा मोर्चा ता.अध्यक्ष पदी सोमनाथ नाना गायकवाड. तर  माढा ता. सरचिटणीस पदी मदन मुंगळे व डी एम मोरे यांची निवड*
------------------------------------------ 

*टेंभुर्णी /प्रतिनिधी*     aj24taas न्युज नेटवर्क

टेंभुर्णी [प्रतिनिधी]   दि 25.  भारतीय जनता पार्टी तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक वरवडे तालुका माढा येथे माढा तालुका अध्यक्ष संजयदादा टोणपे यांच्या अध्यक्षतेखालीअतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली . या बैठकीत तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून गावोगावचे भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी वरवडे येतील भारतीय जनता पार्टीच्या युवा फळीतील धडाडीचे कार्यकर्ते सोमनाथ नाना गायकवाड यांची निवड करण्यात आली तसेच भाजपचे जुने जाणते कार्यकर्ते मदन सेठ मुंगळे व बावी तालुका माढा येथील डी एम मोरे यांची भारतीय जनता पार्टीच्या तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली तसेच तालुका चिटणीस म्हणून माळेगाव तालुका माढा येथील नागनाथ ( अण्णा) गायकवाड यांची निवड करण्यात आली. लवळ शहराध्यक्ष म्हणून महादेव चव्हाण यांची ही निवड करण्यात आली अतिशय खेळीमेळीत पार पडलेल्या या बैठकीस मार्गदर्शन करताना संजय दादा म्हणाले की भारतीय जनता पार्टी हा पक्ष लोकशाही मार्गाने व सर्व कार्यकर्त्यांना विचारात घेऊन चालणारा पक्षी असून या पक्षातील सर्व निवडी या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन सर्वानुमते होतात त्यामुळे अध्यक्षांना वाटलं म्हणून कुणाची निवड करता येत नाही या पक्षातील सर्व कार्यकर्ते हे पक्षशिस्त पाहणारे व पक्षासाठी तळमळीने काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यामुळे पक्षात एकसंघता राहावी पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे यासाठी या निवडी तुमच्या सर्वांच्या सहमतीने होत्यात म्हणूनच भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष ची निवड करताना अनेक जण इच्छुक होते या सर्वांमध्ये विचार विनिमय करून कार्यकर्त्यांनी उदार मनाने सुभाष बापू इंदलकर दत्ता जाधव हेही चूक असताना त्यांनी सोमनाथ नानांची निवड केली असेच एकसंधपणे राहून तालुक्यात पक्षाची वाढ करू तुमच्या सर्वांचे पाठबळ हीच माझी ताकद आहे असे म्हणून तालुकाध्यक्ष संजय टोनपे नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते ऋतू नाना बेंबळे कर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विनायक भगत माजी तालुकाध्यक्ष श्रीधर शिंदे भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष विष्णू तात्या बिचकुले , तालुका उपाध्यक्ष औदुंबर भागवत , टेंभुर्णी शहराध्यक्ष डॉक्टर सयाजी देशमुख , युवा मोर्चाचे टेंभुर्णी अध्यक्ष विजय कोकाटे , तालुका प्रसिद्धीप्रमुख सुरज भैया देशमुख , मोडणीम चे नितीन गडधरे,अविनाश धोत्रे कोंडार भागाचे युवक नेते विनायक आबा केंचे वेणेगाव चे सोपान आप्पा पवार विजय महासागर लवूळ चे संकेत पाठक दत्ता जाधव अविनाश धोत्रे व माढा तालुक्यातील भाजपचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा