Breaking

मंगळवार, १८ ऑगस्ट, २०२०

*आरोग्य मंत्री यांच्या आग्रहास्तव ना. बाळासाहेब पाटील कोविडच्या उपचारासाठी मुंबईला रवाना

*


*आरोग्य मंत्री यांच्या आग्रहास्तव ना. बाळासाहेब पाटील कोविडच्या उपचारासाठी मुंबईला रवाना*

*कराड -प्रतिनिधी /विशाल पाटील* 
*aj24taas news*
**************************

कराड   दि.18      चार दिवसापूर्वी राज्याचे सहकार मंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्यांच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते.

सोमवारी सांगली दौऱ्यावर असणाऱ्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कराडच्या कृष्ण हॉस्पिटल ला भेट देऊन सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. बाळासाहेब पाटील यांचे प्रकृती चांगली असून खबरदारी म्हणून अधिकच्या उपचारांसाठी त्यांना मुंबईला येण्याचा आग्रह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले त्यामुळे आज बाळासाहेब पाटील मुंबईला रवाना झाले...

दरम्यान काल रात्री चित्रफितीद्वारे ना. बाळासाहेब पाटील यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की पॅनिक होऊ नका...घाबरून जाऊ नका... मी लवकरच उपचार घेऊन बरा होऊन परत आपल्या सेवेसाठी येणार आहे...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा