.
*कोरोनाने केले गंभीर स्वरुप धारण सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्नांची होते हेळसांड-माजी मंञी हर्षवर्धन पाटील*
------------------------------------------
*aj24taas news*
प्रतिनिधी शिवाजी पवार
*********************-***
इंदापुर दि. 20
इंदापूर तालुक्यात कोरोनाने
गंभीर स्वरूप धारण केले असून अनेक सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णाची हेळसांड होत आहे, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन नाही, मेडिसिन उपलब्ध नाही, पॉझिटिव्ह रुग्ण ज्या ठिकाणी ठेवले आहेत त्या ठिकाणी स्वच्छता नाही, अश्या अनेक तक्रारी रुग्णांच्या मार्फत आमच्यापर्यंत पोहोचत असून प्रशासन करतय काय ? हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहतो असा आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.
त्यामुळे जनतेचा विश्वास प्रशासनावर राहणार नाही, अशीच गंभीर परिस्थिती राहिल्यास इंदापूर मध्ये रुग्ण आणखी वाढतील व कोरोना चा उद्रेक होईल. इंदापूरमध्ये टेस्टिंगची सुविधा नसल्याने कोरोना रिपोर्ट कसे करणार असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला.
या वेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की मी काही दिवसापूर्वी टेस्टींग वाढवा अशी मागणी प्रशासनाला केली होती परंतु टेस्टिंग केली तर नागरिकांना कॉरनटाईन करावे लागेल व त्याची व्यवस्था प्रशासनाला करावी लागेल यामुळे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. असा आरोप माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला अाहे.
अशा पद्धतीने सामान्य लोकांच्या जीवाशी खेळण्यासाठी प्रशासनाने काम करू नये त्याचबरोबर तालुक्यात औषधांचा पुरवठा होत नसल्याने जनता घाबरत आहे त्या बाबतीत जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना पत्र दिले असून यापुढे अशा पद्धतीने दुर्लक्ष झाल्यास त्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाची असेल असा गंभीर इशारा हर्षवर्धन पाटील यांनी दिला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा