*जन्म दात्या बापाचा मुलानेच केला दोन साथिदाराच्या साहाय्याने निर्घुन खून ; तिघांनाही सहा दिवसाची पोलीस कोठडी*
------------------------------------------
टेंभुर्णी [प्रतिनिधी ] दि.28 बापाच्या बाहेरख्याली पणास व सतत घालून पाडून बोलण्याच्या सवयीस कंटाळून मुलानेच दोन साथीदारांसह कट रचून निर्घृण खून केला असून या खून प्रकरणी मुलासह दोन जणांना अटक केली असल्याची व तिघांना सहा दिवसाची पोलिस कोठडी ठोठावल्याची माहिती टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी पत्रकार परिषदेत .माहीती दिली.
संजय मारुती काळे (वय-५५) रा.शिराळ (टें) तालुका माढा असे मयताच्या नाव असून आकाश संजय काळे (वय-२०) रा.शिराळ (टें) लक्ष्मण रघुनाथ बंदपट्टे (वय-२७) व अल्लाउद्दीन उर्फ आलम बासू मुलाणी (वय-३३) दोघे रा.सुर्ली ता.माढा अशी पोलीस कोठडी ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की,शिराळ (टें) येथील संजय मारुती काळे हा दि.२५ जुलै रोजी शनिवारी रात्री करून जेवण झोपला होता.यानंतर रविवारी सकाळी संजय काळे घरातून गायब असल्याचे कुटुंबियांच्या निदर्शनास आले.त्याचा त्यांचा छोटा हत्ती टेम्पो ही गायब होता.यामुळे सकाळी त्याची शोधाशोध सुरू होती.त्याचा फोन ही लागत नसल्याने त्याच्या पत्नीने व मुलाने टेंभुर्णी पोलीस ठाणे गाठून तो गायब असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.
दरम्यान इकडे शेवरे (ता.माढा) येथे अकलूज-टेंभुर्णी रस्त्याच्या पूर्वेस उजनी कॅनॉलपासून अर्धा कि.मी.अंतरावर कॅनॉलच्या भराव्याखाली एक टेम्पोसह (एम.एच.४५-६५७७) छातीच्या खालचा भाग पूर्णपणे जळालेल्या अवस्थेतील अनोळखी इसमाचा मृतदेह ग्रामस्थांना रविवारी ८.३० वा.सुमारास दिसून आला होता.मृताच्या चेहऱ्यावर गळ्यावर कोणीतरी तीक्ष्ण शस्त्राने निर्घृणपणे वार केलेले होते.तसेच पुरावा नष्ट करण्याच्या हेतून मृतदेहाच्या अंगावर टायर जळालेली स्टेपनी व जळून खाक झालेला टेम्पो दिसून आला होता.यामध्ये छाती व डोक्याचा भाग वगळता मृताचे संपूर्ण शरीर जळून खाक झालेले होते.अतिशय क्रूरपणे मारुन पुरावा नष्ट करण्याचा झालेला प्रयत्न यामुळे ही घटना पाहून या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
संजय काळे याची शोधाशोध सुरू असताना शेवरे येथे मृतदेह मिळून आल्याची माहिती मिळताच काहीजणांनी तेथे जाऊन पाहिले असता तो मृतदेह संजय काळे याचाच असल्याचे निष्पन्न झाले.यामुळे संजय काळे याचा एवढ्या निर्दयपणे कोणी व का खून केला असा प्रश्न निर्माण होत आहे.मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला होता.
याबाबत मयताचा मुलगा आकाश संजय काळे याने रीतसर फिर्याद दिली होती.या निर्घृण खुनाच्या तपासाचे मोठे आवाहन असताना टेंभुर्णी पोलिसांनी पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अतिरिक्त पोलीस अधिक्षक अतुल झेंडे,विभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी आरोपींच्या तपासासाठी एपीआय अमित शितोळे व एपीआय सुशील भोसले यांची दोन तपास पथके तयार करून व गुप्त माहितीगारा मार्फत ही शोध करण्यात येत होता
मुलावर संशय : -
पोलिसांनी सुरुवातीस घरातून तपास सुरू करीत फिर्यादी मुलगा व आई यांचे जबाब नोंदविले यात तफावत असल्याने व घराची पाहणी केल्यामुळे संशयाची सुई मुलाच्या दिशेने जात असल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी करताच त्याने खुनाची कबुली देत दोन साथीदारांची नावे सांगितली.तसेच वडीलाच्या बाहेरख्यालीपणामुळे घरात सतत तणावाचे वातावरण असायचे वडील नेहमी घालून-पाडून बोलून अपमान करीत असत.त्यांचे चारित्र्य नीट नव्हते त्यांचे अनेक महिलांशी संबध होते.या नेहमीच्या भांडणास कंटाळलो होतो अशी माहिती दिली.
असा केला कट : -
वडिलांचे व्यवहार मुलास माहीत होते.काही दिवसांपूर्वी यातील आरोपी अल्लाउद्दीन उर्फ आलम मुलाणी यांचे बरोबर पैशाच्या देवाण-घेवाणीवरून वडिलांचे भांडण झाले होते.ही संधी साधून मुलाने या मुलाणी व लक्ष्मण बंद पट्टे या दोघाबरोबर शनिवारी एका पेट्रोल पंपावर बसून कट केला व त्याच रात्री तिघांनी मिळून घराच्या अंगणात झोपलेल्या बापावर रात्री १० वा. सुमारास तलवार व कोयत्याने वार करून निर्घृणपणे त्यांचा खून केला.तसेच रक्ताने माखलेली पांघरायची रग,गादी यांमध्ये मृतदेह गुंडाळून तो टेम्पोत टाकून आडमार्गाने त्यांनी शेवरे येथे कालव्याच्या साईडला नेऊन मृतदेह टेम्पोतील डिझेल अंगावर व टेम्पोवर टाकून पेटवून दिला.
यानंतर पोलिसांनी बंदपट्टे यास सुर्ली येथे अटक केली तर अल्लाउद्दीन उर्फ आलम मुलाणी यास पळून जात असताना पुणे येथे जाऊन पकडले.या तिघांना मंगळवारी माढा कोर्टात हजर केले असता सर्व आरोपींना न्यायाधीश एस.एस.सय्यद यांनी सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.सरकारी वकील म्हणून विशाल सक्री यांनी तर आरोपीच्या वतीने अॅड संतोष कानडे यांनी काम पाहिले.
*टेंभुर्णी पोलिसांनी दोन दिवसात लावला तपास*
टेंभुर्णी पो नि राजकुमार केंद्रे,ए पी आय अमित शितोळे,ए पी आय सुशील भोसले,असि. पोलीस फौजदार अशोक बाबर,पोहेकॉ अभिमान गुटाळ,दत्ता वजाळे, धनाजी शेळके,विनोद पाटील,बाळासो चौधरी,सायबर सेलचे अन्वर आतार यांनी यशस्वी तपास केला.यात आणखी कोणी सामील आहे का?याचा तपास सुरु आहे.
बातम्या व जाहीरतीसाठी संपर्क मो.9921581001 /९९२१५८१००१


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा