कुसमोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम मोठ्या दिमाखात संपन्न
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस -
माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील जि परिषद प्राथमिक शाळेला नुकतीच २५ वर्ष पूर्ण झाली याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती व पालक ,ग्रामस्थांनी शाळेचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य राजकीय विश्लेषक, बखर लाईव्ह पुणे चे संपादक उमेश घोंगडे,राष्ट्रीय बाल व महीला विकास परिषदेच्या महासचिव तथा नॅशनल चाईल्ड वुमन डेव्हलपमेंट कौन्सिल च्या जनरल सेक्रेटरी श्रद्धा जवंजाळ, पुणे विद्यापीठाच्या उपलाने मॅडम, विस्तार अधिकारी, सुषमा महामुनी, केंद्र प्रमुख मुज्जमिल जमादार,सरपंच महावीर धायगुडे, माजी सरपंच तुषार लवटे ,प्रा नंदकुमार लोखंडे यासह शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शिक्षक ,पालक ,कुसमोड व आसपासच्या परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिमाखदार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गिताने करण्यात आली.यावेळी शाळेसाठी जमीन दान करणाऱ्या तसेच शाळा सुरु झाल्यापासून असणाऱ्या शिक्षकांचा यावेळी विशेष सन्मान करणयात आला. शाळेचा सुरुवातीचा काळ व सध्याची झालेली सुधारणा याविषयीचे बॅनर यावेळी लावण्यात आले होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश मदने,उपाध्यक्ष तुषार पवार व सर्वांनी उपस्थितथांचे स्वागत केले.या कार्यक्रमास शाळा परीसरातील ग्रमस्थ ,पालक ,शिक्षणप्रेमी व शिक्षकांनी जवळपास ७७००० हजाराची देणगी दिली. यावेळी शाळेचे शिक्षक सचिन गाटे यांनी शाळेचा लेखाजोखा मांडला.तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार व संपादक उमेश घोंगडे यांनी एखाद्या जि प शाळेचा रौप्य महोत्सव साजरा करणयाची ही बहूतेक पहीलीच वेळ असेल.या शाळेतुन सुजाण नागरिक घडविला जातो .तर आपण शाळेस सर्वोतोपरी सहकार्य करु असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.यावेळी श्रद्धा जवंजाळ मँडम यांनीही या जि प शाळेचे कौतुक केले.तर शिक्षण विस्तार अधिकारी सुषमा महामुनी यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.तसेच पुणे विद्यापीठाच्या उपलाने मॅडम यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. प्रा नंदकुमार लोखंडे यांनी शाळेसाठी अकरा हजार रुपयाचे फिक्स डिपॉझिट देणार असल्याचे जाहीर केले यातून मिळणाऱ्या व्याजाची रक्कम चौथीत प्रथम येणाऱ्या विदयार्थला बक्षीस देणयात येणार आहे. या कार्यक्रमास शिक्षक पतसंस्थेचे विविध पदाधिकारी, शिक्षक ,ग्रामस्थ, पालक ,शिक्षणप्रेमी हितचिंतक, पत्रकार ,कर्मवीर भाऊराव पाटील विदयालयाचे माजी शिक्षक पांढरमिसे सर शाळा परिसरातील सर्व, पालक ,ग्रामस्थ ,शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पवारस्ती येथील शिक्षक सचिन गाटे व गाटे मडम यांचा सरपंच महावीर धायगुडे,माजी उपसरपंच संजय पाटील ,दामोदर लोखंडे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुहास उरवणे सर यांनी केले तर आभार बापु पवार व दादा पवार यांनी मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करणयात आली. फोटो - कुसमोड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पवारवस्ती शाळेतील आयोजित रौप्य महोत्सवी कार्यक्रम .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा