Breaking

शनिवार, १३ जुलै, २०२४

जिगरबाज सागरच्या पाठीवर सुरज देशमुखांनी दिली कौतुकाची थाप, सोबतच उपचारासाठी आर्थिक मदतदिवेघाटात दोरखंडात अडकलेल्या मुलाचा जीवदान देणाऱ्या सागर खंकाळचा आलेगाव बु येथे केला सत्कार



जिगरबाज सागरच्या पाठीवर सुरज देशमुखांनी दिली कौतुकाची थाप, सोबतच उपचारासाठी आर्थिक मदत

दिवेघाटात दोरखंडात अडकलेल्या मुलाचा जीवदान देणाऱ्या सागर खंकाळचा आलेगाव बु येथे केला सत्कार 


कन्हेरगाव (प्रतिनिधी)

        माऊलीच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होत असताना दि. २ जुलै  रोजी दिवेघाटात वारीवर आलेल्या अल्पशा संकटाने सर्वांच्या हृदयाचा ठोका चुकविला. आणि सगळी कडे अचानक धावपळ चालु झाली. या वारीत आपल्या अडीच वर्षांच्या चिमुकल्याला घेऊन विठ्ठलाचा पायाशी जाणारी माऊली दिवेघाट चढत असतानाच रथ बैलाने ओढताच, रथाच्या मागील बाजूचा दोर खेचला गेला. त्यावेळी दोराच्या आतून चालणारे १५ ते २० वारकरी सपशेल डांबरी रस्त्यावर खाली पडले. त्यामध्ये काही पोलीसांचा ही समावेश होता. यावेळी एक माऊली आपल्या दोन वर्षांच्या मुलाला घेवून पायी चालत होती. तीही पडली, हातातील बाळ निसटले. आणि दिसेनासे झाले. मात्र सागर नावाच्या जिगरबाज तरुणाने प्रसंगावधान बाळगत ते बाळ गर्दीत दिसताच जीवाची पर्वा न करता या चिमुकल्याला उराशी घट्ट धरले आणि होणारां अनर्थ टाळला. सागराच्या या धाडसाला सलाम करत आज सुरज देशमुख यांच्या वतीने त्याचा सत्कार सन्मान करण्यात आला. 

सदर घटनेते सागर खंकाळ याला प्रचंड दुखापत झाली होती. डावा पाय, डावा हात पूर्णपणे सावळून निघाला आहे. अंगावर दहावीस वारकरी पडल्याने छातीवर प्रचंड दाब पडून दुखापत झाली. त्यामुळे इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात खंकाळ यांचे ईसीजी, एक्सरे व सीटी स्कॅन करण्यात आले. सागरच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याचाच एक भाग म्हणून युवा नेते सुरज देशमुख यांनी सागरच्या कार्याचां गौरव करत त्याच्या उपचारासाठी त्याला १५,०००/- रुपयाची आर्थिक मदत करत त्याचा यथोचित सत्कार केला. 

सागरने घटनेत सापडलेल्या बाळाला खरचटू देखील दिले नाही. स्वतः मात्र रक्तबंबाळ झाला. हाता पायाला प्रचंड जखमा झाल्या. मात्र त्या बाळाला त्याने सुरक्षित बाहेर काढले. रथाच्या समोरील बाजूस सात बैलजोडी जुंपण्यात आल्या होत्या. तसेच रथाच्या पाठीमागील दोर हा गोल स्वरूपाचा रथाला बांधला होता. अनेक वारकरी त्या दोराच्या आतून चालत होती. बैलाने रथ ओढताच पाठीमागील दोर खेचला गेला होता. दोराच्या आतुन चालणारे जवळपास २० ते २५ वारकरी पडले होते.
त्यामध्ये एक महिला व दोन- अडीच वर्षाच बाळ त्या गर्दी मध्ये दिसेनासे झाले होते. सर्व माणसं दोराला अडकून जवळपास २० फूट फरफडत ओढली गेली. हा सर्व प्रकार थांबवल्या नंतर रस्त्यावरती फरफडलेली आई जिवाच्या आकांताने बाळाला शोधत होती.
त्यावेळी अंगावरती स्नेहप्रेमी मित्र परीवार इंदापूर असे टि-शर्ट असणाऱ्या व रक्तबंबाळ झालेल्या सागर खंकाळ या तरुणाच्या हातामध्ये ते बाळ सुखरुप होत. हे पाहून ती आई डसाडसा रडू लागली. सागरच्या या धाडसाने भविष्यातील घटना टळली. सागर खंकाळ हा आलेगाव बु ता.माढा येथील तरुण आहे. सागरच्या या धाडसाचे आणि कार्याची दखल घेत सुरज देशमुख व मित्र परिवाराच्या वतीने त्यास आर्थिक मदत करून त्याचा सत्कार केला. तर येत्या काळात सागराला कोणत्याही मदतीची गरज लागल्यास आपण सदैव सोबत आहोत अशी प्रांजळ भावना व्यक्त केली.
 यावेळी संतोष आप्पा चंदनकर, बाळासाहेब चंदनकर,वस्ताद अमित, डॉ. सुदाम कुंभार, पांडुरंग कवडे, गणेश कवडे, माऊली चंदनकर, सुधीर पाटील, नितीन चंदनकर, माऊली चंदनकर, सत्यवान वाघमारे, प्रदीप चंदनकर, सोमनाथ भोसले, विष्णु वायकर, अशोक ढवळे, ईश्वर दसवंत आदी उपस्थित होते. 

चौकट 

सागरसारख्या तरुणासोबत सदैव असणार - सुरज देशमुख 


दिवेघाटात घडलेल्या घटनेत सागरने आपल्या माणुसकीचे दर्शन घडवत जीवाची बाजी लावून चिमुकल्याचा जीव वाचवला. सागर हा आपल्याच भागातील आलेगाव बु या गावचा युवक आहे. त्याने हे केलेले कार्य अनमोल असून सर्व समाज त्याच्या ऋणात असेल, सागरच्या या कर्तुत्वाबाबत एक सामाजिक बांधिलकी जोपासत त्याच्या उपचारासाठी त्याला आर्थिक मदत करून त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. सागर सारखी वृत्ती समाजात वृध्दींगत होऊन त्याचा फायदा समाजाला व्हावा ही अपेक्षा. सागर सारख्या आणि अशा वृत्तीच्या पाठीशी आम्ही सदैव असून भविष्यात त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल..

सुरज देशमुख 
टेंभुर्णी ता.माढा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा