Breaking

बुधवार, २६ जून, २०२४

बेंबळे येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*


*बेंबळे येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल*


टेंभुर्णी प्रतिनिधी:-

बेंबळे तालुका माढा येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले असून याबाबत समजलेली माहिती अशी की 

बेंबळे येथील अल्पवयीन  मुलीला पळवल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून एका आईने राहणार बेंबळे तालुका माढा वय  40 वर्ष धंदा मजुरी यांच्या अल्पवयीन मुलीस दिनांक 25/ 6/ 2024 रोजी सकाळी 11 च्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळविण्यात आलेले आहे

 अशा स्वरूपाची टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीच्या आईने अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केलेली असून याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल 363 प्रमाणे अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मोरे हे करीत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा