Breaking

गुरुवार, १६ नोव्हेंबर, २०२३

पिलीव येथील आठवणी ९५ या माजी विदयार्थी सामाजिक संघटनेच्या अध्यक्षपदी संजय पाटील यांची तर उपाध्यक्षपदी नितीन शिंदे यांची निवड


पिलीव येथील  आठवणी  ९५ या माजी  विदयार्थी  सामाजिक  संघटनेच्या अध्यक्षपदी  संजय पाटील  यांची तर उपाध्यक्षपदी  नितीन  शिंदे यांची निवड      

   


                      पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस - माळशिरस तालुक्यातील  पिलीव येथील  आठवणी  ९५  या माजी  विदयार्थी  सामाजिक  संघटनेच्या  अध्यक्षपदी  पत्रकार  संजय पाटील  यांची तर उपाध्यक्षपदी  नितीन  शिंदे  व सचिव पदी सचिन  गाटे यांची सर्वानुमते  बिनविरोध निवड करण्यात आली. आठवणी  ९५ ही  माजी विदयार्थीनची गेल्या  अनेक  वर्षापासून  सामाजिक  क्षेत्रात  कार्यरत असणारी सामाजिक संघटना आहे .या संघटनेमार्फत  विविध  सामाजिक  उपक्रम, गोरगरीब विदयार्थीना  मदत,आरोग्यविषयक  मार्गदर्शन  ,शैक्षणिक  क्षेत्रात   येणाऱ्या  अडी अडचणी  सोडविणे असे अनेक  सामाजिक  उपक्रम  राबविले जातात. यावेळी  माजी अध्यक्ष  उमेश  देशमुख  यांच्या  हस्ते  नुतन अध्यक्ष  संजय पाटील  यांचा तर माजी उपाध्यक्ष  अविनाश  जेऊरकर  यांच्या  हस्ते  नुतन उपाध्यक्ष  नितीन  शिंदे  तसेच  सचिन  गाटे यांचा सत्कार करण्यात आला. हया वर्षी  गोल्डन  महीला  म्हणून  सत्यभामा मदने हिचा साडी देऊन  तर गोल्डन  पुरुष म्हणून  सुर्यकांत  मदने यांना  मानाचा फेटा देणयात आला या  मेळाव्याप्रसंगी  डॉ    स्मिताराणी पाटील, राणी महामुनी,अनिता जगदाळे ,सत्यभामा  मदने, गुजरे,देशमुख, डॉ विलास  जाधव, डॉ भागवत जाधव, संतोष  मदने,उमेश देशमुख, अविनाश  जेऊरकर, जयंत गोरे,योगेश विरकर संग्राम पाटील , प्रदीप वगरे,विशाल  शिर्के, ईस्माईल पठाण,गुरूदेव पंडीत,सुर्यकांत  मदने,यावेळी    सुत्रसंचालन  सचिन गाटे सर यांनि  केले तर आभार  नुतन अध्यक्ष  संजय पाटील  यांनी मानले.         फोटो  - पिलीव येथील  आठवणी ९५ या  सामाजिक  संघटनेच्या  मेळाव्याप्रसंगी  उपस्थित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा