*जिल्हा परिषद केंद्रीय शाळा जवळगा पोमादेवी शाळेत शिक्षक दिन साजरा*.
जिल्हा परिषद केंद्रीय शाळा जवळगा पोमादेवी शाळेत दिनांक 5 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी शाळेतील प्रांगणामध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री स्वरुप नाना सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले व त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या समवेत शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सेवाजेष्ठ शिक्षिका श्रीमती पुष्पा जाधव मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याध्यापक श्री स्वरुप नाना सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील सर्व शिक्षक श्री माधव राठोड सर, श्रीमती त्रिषला पाटील मॅडम, जयश्री गौतम मॅडम, मीरा बनसोडे मॅडम,कुशावर्ती जमादार मॅडम व सतीश बेडगे सर , यांचा गुलाब पुष्प देऊन शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती उज्ज्वला वाडेकर यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा