Breaking

सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

केंद्र शासनाने उसाच्या एफ आर पी किमती बरोबर साखरेची एम एस पी वाढवून दिल्यास साखर उद्योगाला वैभव संपन्न दिवस येतील... .... आमदार बबनदादा शिंदे



केंद्र शासनाने उसाच्या एफ आर पी किमती बरोबर साखरेची एम एस पी वाढवून दिल्यास साखर उद्योगाला वैभव संपन्न दिवस येतील...आमदार बबनदादा शिंदे



.... कामगारांना दोन महिन्याचा पगार बोनस जाहीर ...आगामी गळीत हंगामात 28 लाख मेट्रिक टन ऊस गाळप करणार..
.. ऊस बिलाचा प्रति टन 2450 रुपये पहिला हप्ता देणार


 बेंबळे ।प्रतिनिधी                    

           केंद्र सरकारने ऊसाची एफ आर पी किंमत वाढवताना साखर विक्रीची एम एस पी किंमत पण वाढवून द्यावी तरच साखर उद्योगाला राज्यांमध्ये वैभव संपन्न दिवस प्राप्त होतील, तसेच इथेनॉल साठी प्रत्येक लिटरला पाच रुपये वाढवून मिळावेत असे प्रतिपादन विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आमदार बबनदादा शिंदे यांनी साखर कारखान्याच्या 24 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून बोलताना केले आहे. त्याचप्रमाणे कारखान्याच्या कामगारांना  दीवाळी निमित्त दोन महिन्याचा बोनस पगार देण्यात येणार असून येत्या 2023 -2024 गळीत हंगामात पिंपळनेर युनिट एक व करकंब युनिट दोन मधून  ते 28 लाख मे.टन उसाचे गाळप करण्याचा आमचा मानस असल्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी आवर्जून सांगितले. या प्रसंगी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा कारखान्याचे संचालक रणजीतभैय्या शिंदे कारखान्याचे उपाध्यक्ष वामनभाऊ उबाळे कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे जनरल मॅनेजर सुहास यादव आदी प्रमुख उपस्थित होते.     
          कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर कार्यकारी संचालक संतोष डिग्रजे यांनी आर्थिक अहवालाचे वाचन करून  सर्व ठराव सादर केले , उपस्थित सभासदांनी  ठरावास आवाजी मंजुरी दिली.
       आमदार बबनदादा शिंदे पुढे बोलताना म्हणाले की वीस-बावीस वर्षांपूर्वी 2000 टन क्षमतेचा विठ्ठलराव शिंदे कारखाना आज 11 000 मेट्रिक टन गाळप क्षमतेपर्यंत विस्तारित केला आहे ,आता भविष्यात 20000 टन प्रतिदिन गाळ करण्याचा मानस होता परंतु निसर्गाची अवकृपा दिसत असल्यामुळे थोडे थांबण्याचे ठरवले आहे. मागील हंगामात शेतकऱ्यांना 2650 रुपये एफआरपी व पन्नास रुपये अधिक वाढवून एकुण 2700 रुपये प्रति टन दर दिलेला आहे .कामगारांनी देखील उत्तम सहकार्य मिळत असल्यामुळे त्यांना दोन महिन्याचा बोनस पगार बोनस म्हणून देण्यात येणार आहे.  इथेनॉल साठी सरकारने  60 आणि 65 रुपये मिळणाऱ्या दरापेक्षा पाच रुपये दर वाढवून द्यावा असेही दादांनी सांगितले.
       केंद्र सरकार ऊसाची एफ आर पी म्हणजे वाजवी व किफायदशी किंमत वाढवून देते परंतु याचबरोबर एम एस पी म्हणजे साखरेची मार्केटमधील किमान आधारभूत किंमत वाढवून देण्याचा  विचार करत नाही परंतु एफ आर पी बरोबर एसएमपी वाढवून दिल्यास संपूर्ण साखर उद्योगाला वैभव संपन्न दिवस निश्चित येतील याबद्दल विश्वास वाटतो.
          पिंपळनेर युनिट एक व करकंब युनिट दोन साठी पुढील हंगामात  50 हजार हेक्टर उसाच्या नोंदी उपलब्ध आहेत, शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर तोडला जाईल कुणीही घाई करू नये. पुढील हंगामात शेतकऱ्यांना 2450 रुपये प्रति टन पहिले ऊस बिल देण्यात येईल व मागील हंगामा प्रमाणेच प्रत्येक दहा दिवसाला शेतकऱ्यांच्या गाळप झालेल्या उसाचे पैसे खात्यावर जमा केले जातील. ...
       आमदार बबनदादा शिंदे पुढे म्हणाले की १ सप्टेंबर 23 रोजी माझ्या वाढदिवसानिमित्त  आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ११२५९ रक्त बाटल्याचे संकलन झाले आहे व हे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद होण्याची शक्यता आहे ,यापुढे महिलांचा एचबी तपासणी साठी सर्वत्र आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहेत. वाढदिवसाच्या औचित्येने माढा येथे संकल्प प्रतिष्ठान आयोजित कर्मयोगी बबनराव शिंदे नेत्रालय सुरू करण्यात आले व त्यास 72 लाख रुपये देणगी आत्तापर्यंत मिळाली आहे, या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक व गरीब नेत्र रुग्णांना अतिशय माफक दरात  उपचार केले जातील असेही दादांनी आवर्जून सांगितले.
          या सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी संचालक रमेश येवले पाटील प्रभाकर कुटे सुरेश बागल पोपटराव चव्हाण पोपटराव गायकवाड अमोल चव्हाण नीलकंठ पाटील विष्णू हुंबे लक्ष्मण खुपसे वेताळा जाधव, नागटिळक,  सचिन देशमुख,बापू डोके , संदिपान पाटील, पांडुरंग घाडगे, मोरे अनिल वीर , खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बंडूनाना ढवळे मार्केट कमिटीचे संचालक दिलीपराव भोसले संतोष  अनभुले रामभाऊ शिंदे जिल्हा परिषद माजी सदस्य शिवाजीराव पाटील साखर कारखान्याचे केन मॅनेजर संभाजी थिटे सुरक्षा प्रमुख फारूक दुंगे  यांचे सह सर्व विभाग प्रमुख अधिकारी कर्मचारी व शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी तर आभार प्रदर्शन संचालक सुरेश बागल यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा