Breaking

शनिवार, ८ जुलै, २०२३

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी दिनेश भांडवलकर यांची निवड



मकाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी दिनेश भांडवलकर यांची निवड



जेऊर प्रतिनिधी मकाई सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी नूतन संचालक दिनेश भांडवलकर यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांच्या निवडीसाठी मकाईचे जेष्ठ संचालक बाळासाहेब पांढरे यांनी अनुमोदन दिले या बैठकीच्या अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी सोपान टोम्पे हे हजर होते मकाई सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी सकाळी ११ वाजता चेअरमन निवडीची बैठक संपन्न झाली यावेळी बागल गटाचे नेते शमी बागल तसेच माकायचे माजी चेअरमन दिग्विजय बागल यांचे सर्व नूतन संचालक काही सभासद व प्रभारी कार्यकारी संचालक हरिश्चंद्र खाटमोडे हे उपस्थित होते या निवडीच्या वेळी नेत्यांच्या सूचनेनुसार दिनेश भांडवलकर यांचा एकमेव अर्ज सादर झाला सर्व संचालकांनी त्या सार्वजन दिले त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी श्री भांडवलकर हे चेअरमन झाल्याचे जाहीर केले रश्मी बागल तशी दिग्विजय बागल यांनी श्री भांडवलकर यांचे अभिनंदन केले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा