Breaking

शुक्रवार, ३० जून, २०२३

संजीवनी कुटे हिने साकारली विठ्ठलाचे हुबेहूब छायाचित्र.



संजीवनी कुटे हिने साकारली विठ्ठलाचे हुबेहूब छायाचित्र.


टेंभुर्णी प्रतिनिधी.

 काल देवशयनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून रांगोळी कलाकार संजीवनी कुटे हीने विठ्ठल मंदिरामध्ये  हुबेहूब विठ्ठलाची रांगोळीच्या माध्यमातून प्रतिमा साकारली. ही प्रतिमा 8×4 इतक्या साईजची होती ही प्रतिमा रेखाटण्यासाठी  तब्बल दोन तास वेळ लागला. यापूर्वी तिने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये रांगोळी पायघड्यांची सेवा दिली. त्याची सुरुवात निमगाव केतकी पासून केली होती. त्यामध्ये देखील संत तुकाराम महाराजांची  12×6 साइजची हुबेहूब रांगोळीच्या माध्यमातून प्रतिमा साकारली होती. त्यानंतर तिने संत सोपान देव महाराज पालखी सोहळ्यामध्ये देखील रांगोळी पायघड्यांची सेवा दिली होत. या सोहळ्यामध्ये निरवांगी या ठिकाणी देखील रांगोळीच्या माध्यमातून विठ्ठलाची हुबेहूब प्रतिमा साकारली होती. सोशल मीडियावर संजीवनी च्या रांगोळ्या चे प्रचंड कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा