बेलवंडी पोलीस करणार रोड रोमीओचा बंदोबस्त...
.
श्रीगोंदा-नितीन रोही,
तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशन हददीमधील शाळा, महाविदयालये खाजगी कोचिंग क्लास परिसरामध्ये विनाकारण मुलीची छेडछाड करणे, मागे पुढे धुम स्टॉईलने गाडी पळवणे, शाळा / महाविदयालय भरताना / सुटताना शाळे बाहेरील मुले शाळेच्या परिसरामध्ये थांबुन मुलीना त्रास देतात अशा रोड रोमीओचा बंदोबस्त करण्यासाठी बेलवंडी पोलीसांनी कंबर कसली आहे त्या अनुषंगाने दि. ०१/०२/२०२३ रोजी १३/०० ते १४/०० वा. दरम्यान बेलवंडी पोलीस स्टेशन हददीतील शाळा, विदयालय, मुख्याध्यापक / प्राचार्य यांची संयुक्त बैठक पोलीस निरिक्षक दिनेश आहेर साहेब यांनी आयोजित केली त्यामध्ये शाळा व महाविदयालयात सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविणे, १८ वर्षा खालील मुला मुलीना टू व्हीलर वाहन शाळेमध्ये आणण्यास मनाई करावी, शाळा भरताना / सुटताना आपले शिक्षक गेटवर नेमावे, पोलीस स्टेशनचा नंबर सर्वाना दिसेल असा मोठया अक्षरात लावावा. वाहतूकीचे नियमा बाबत, मोबाईल हॉटसॉफ, फेसबुक, सायबर क्राईम या संदर्भात मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी कोणती काळजी घ्याची या बाबत मार्गदर्शन केले तसेच सर्वाच्या सहकार्यानी वरील समस्या सोडविणेसाठी सदैव तयार आहोत शाळा / विदयालय भरताना / सुटताना पेट्रोलिंग गस्त करुन संबधीत रोड रोमीओचा बंदोबस्त करणे तसेच काही अडचण आल्यास तात्काळ पोलीस स्टेशनला संपर्क करणे बाबत सागितले.
सदर बैठकीस बेलवंडी पो.स्टे. हददीतील शाळा / विदयालयाचे मुख्याध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा