१ वर्षापासून गंभीर गुन्हयातील फरार आरोपीस टेंभुर्णी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे उत्तम कामगिरी
टेंभुर्णी प्रतिनिधी : टेंभुर्णी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील टेंभुर्णी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिस अधिकारी व पोलिसांनी फरार असलेल्या आरोपीस मोठ्या शिताफीने टेंभुर्णी मधील एका हॉटेलमध्ये आला असता पाठलाग करून पकडले. किसन विठ्ठल देशमुख (वय-४८ रा. झिरपे वस्ती टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर ) असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडील विविध गुन्ह्यामध्ये एक वर्षापासून फरार होता.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , फरार आरोपी हा टेंभुर्णी मधील एका हॉटेलमध्ये येणार असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे एका बातमीच्या आधारे त्या ठिकाणी सापळा लावण्यात आला होता. त्याच वेळेस आरोपी किसन देशमुख हा हॉटेलमध्ये आला असता तो पोलिसांना बघून पळून जाऊ लागताच त्यास टेंभुर्णी पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने त्यास ताब्यात घेतले.
टेंभुर्णी पोलिस ठाण्यातील भादंवि ३०७, ३२६, ३२३, ५०६,४२७,४५२,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे गुन्ह्यातील अटक आरोपी किसन देशमुख हा एक वर्षापासून फरार होता.टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गिरीश जोग, उपनिरीक्षक संदेश चंदनशिव, पोलिस नाईक विनोद साठे, पोलिस कॉन्स्टेबल तुकाराम माने- देशमुख, अक्षय सरडे, अक्षय कांबळे या पथकाने हा सापळा लावला होता . सदरची कारवाई पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा