Breaking

मंगळवार, २४ जानेवारी, २०२३

टेंभुर्णी येथे ' वीरांगणा २०२३ खेळ रंगला पैठणीचा ' या कार्यक्रमाचे आयोजन .-सुरज देशमुख



टेंभुर्णी येथे ' वीरांगणा २०२३ खेळ रंगला पैठणीचा ' या कार्यक्रमाचे आयोजन -सुरज देशमुख 

टेंभुर्णी/ AJ 24Taas News  प्रतिनिधी धनंजय भोसले 
***************************************

 महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती व्हावी या उद्देशाने मकर संक्रांतीचे निमित्त आणि रथसप्तमीचा मुहूर्त साधून  ' वीरांगणा २०२३ खेळ रंगला पैठणीचा ' या कार्यक्रमाचे आयोजन टेंभुर्णी तालुका माढा येथे 28 जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूल ग्राउंड , सुर्ली रोड , टेंभुर्णी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती युवा उद्योजक सुरज भैय्या देशमुख व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेबनाना देशमुख यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

      या कार्यक्रमात मनोरंजनात्मक खेळ आणि त्यातून ५ लाखाहून अधिकची बक्षिसे व मानाची पैठणी जिंकण्याची संधी मिळणार आहे.
या स्पर्धेतील सहभागी महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी झी मराठीवरील ' माझी तुझी रेशीमगाठ ' मधील सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे  प्रथमच टेंभुर्णी शहरात उपस्थित राहणार आहेत. सेलिब्रिटी अँकर आर. जे. अक्षय हे या कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहेत. या स्पर्धेत विविध प्रकारचे दहा ते वीस खेळ होणार असून प्रत्येक खेळातून तीन विजेत्यांना बक्षीस व पैठणी भेट दिली जाणार आहे  .त्यामध्ये संगीत खुर्ची , तळ्यात मळ्यात , लिंबू चमचा , रस्सीखेच , बलून गेम आदी प्रकारचे गेम खेळले जाणार आहेत . त्यामध्ये पाच लाखाहून अधिकची बक्षीस व मानाची पैठणी जिंकण्याची संधी टेंभुर्णी परिसरातील महिलांना लाभणार आहे. यामध्ये प्रथम बक्षीस 55 इंची स्मार्ट टीव्ही , द्वितीय बक्षीस वॉशिंग मशीन ,  तृतीय बक्षीस रेफ्रिजरेटर व मानाची पैठणी अशा स्वरूपाची आहे. 

    टेंभुर्णी येथील देशमुख कंट्रक्शन च्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हर्षवर्धन देशमुख , रावसाहेब देशमुख , सुरज देशमुख यांनी ही माहिती दिली . यावेळी गोरख बाप्पा देशमुख , ग्रामपंचायत सदस्य शैलेश ओहोळ , गणेश केचे, बाळासाहेब बारवे, धनंजय लोकरे आदी उपस्थित होते.

         या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या महिलांना देखील लकी ड्रॉ पद्धतीने हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये पैठणी तीन , मिक्सर 3 , बत्तीस इंची स्मार्ट टीव्ही तीन अशी पाच लाखाहून अधिकची बक्षिसे उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ च्या माध्यमातून काढण्यात येणार आहेत.
तरी सर्व महिलांनी आपला घरचा कार्यक्रम समजून या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहून आणि स्पर्धेत सहभागी होऊन आनंद द्विगुणित करावा , असे आवाहन उद्योजक सुरज देशमुख आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष रावसाहेबनाना देशमुख यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा