Breaking

बुधवार, ७ डिसेंबर, २०२२


डॉक्टर बाबासाहेबांना "नॉलेज ऑफ सिम्बॉल" म्हणून जगमान्यता ......यशवंत भोसले
श्री विमलेश्वर विद्यालयांमध्ये महामानवाला आदरांजली..

.

बेंबळे।प्रतिनिधी।                         

                 भारतरत्नडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री विमलेश्वर विद्यालयामध्ये महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक यशवंत भोसले सर यांच्या हस्ते करण्यात आले. 
       आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये यशवंत भोसले सर म्हणाले की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन या महामानवाने जगापुढे एक आदर्श निर्माण केला. ज्या विद्यार्थ्याला साध फळ्याजवळ देखील जाता येत नव्हतं त्या विद्यार्थ्याने देशाचे संविधान लिहून आपल्या विद्वत्तेच्या जोरावर नॉलेज ऑफ सिम्बॉल म्हणून जगमान्यता मिळवली. बाबासाहेबांच्या विचाराचा वारसा घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याने आपली शैक्षणिक प्रगती साधावी असे विद्यार्थ्यांना सूचित केले. प्रशालेचे जेष्ठ शिक्षक एम पी गायकवाड सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. गायकवाड सर यांनी आपल्या मनोगतामध्ये , शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जे तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हा बाबासाहेबांचा एक सुंदर विचार विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवला. या विचाराच्या जोरावरच विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक प्रगती साधली पाहिजे असे त्यांनी ठणकावून सांगितले,बाबासाहेबांचे विचारच या देशातील जनतेला तारतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीब, दिन दलितांसाठी घालविले. बाबासाहेबांच्या विचाराचा आदर्श घेऊन प्रत्येकाने आपली भविष्यात वाटचाल करावी, असा कळकळीचा संदेश त्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केला. 
      प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक बागवाले  यांनी महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांचे वाचन ,लेखन प्रभावी होण्यासाठी वाचन तक्त्याचे प्रकाशन केले. त्यांनी वाचन लेखन विद्यार्थ्यांच्याआयुष्यात किती महत्त्वाचे आहे याचे महत्त्व पटवून दिले.
सदर कार्यक्रमास संस्थेचे संचालक वाय् जी् भोसले , संचालिका पाटील मॅडम, प्रशाला चे मुख्याध्यापक बागवाले सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्रशालेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते. प्रशालेचे सहशिक्षक बीभिषण किर्ते यांनी उपस्थितांचेआभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा