निर्भया पोलीस पथकाची बेंबळे गावी भेट....

बेंबळे ।प्रतिनिधी फोटो
करमाळा विभागाचे डीवायएसपी विशाल हिरे यांच्या अधिपत्याखाली असलेल्या माढा, करमाळा, टेंभुर्णी ,कुर्डूवाडी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात सध्या निर्भया पोलिस पथकाचा विशेष उपक्रम सुरू असून एक डिसेंबर रोजी निर्भया पथकाने बेंबळे येथील विमलेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले .विद्यार्थिनींच्या बाबतीत शाळा कॉलेजमध्ये येताना जर एखाद्या ठिकाणी छेडछाड होत असेल, काही रोड रोमिओ शिट्ट्या वाजवणे, अश्लील भाषेत मुद्दाम ओरडून गोंधळ करणे, शाळा कॉलेजच्या मुलींना नाहक त्रास देणे, मोबाईल वरून अश्लील मेसेज टाकणे किंवा चॅटिंग करणे किंवा मुलींचा पाठलाग करणे असा कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर निर्भयपणे या मुलीनी आम्हास सांगावे, आम्ही निश्चित सर्व बंदोबस्त करतो असे आव्हान याप्रसंगी पोलीस अधिकारी हेमंत पाडूळे व शिवराज गरजे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. शाळा कॉलेजमधील मुला मुलींचे शिक्षण कायद्याच्या चाकोरी मध्येच झाले पाहिजे, तसेच शिक्षण घेणाऱ्या मुलींना भयमुक्त व सुरक्षित शिक्षण घेता आले पाहिजे हा या पथकाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
विमलेश्वर विद्यालयाचे प्राचार्य अशोक बागवाले व सह शिक्षकांनी निर्भया पथकाचे स्वागत केले. बेबळ्याचे पोलीस पाटील बिभीषण कीर्ते यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात निर्भया पथकाचा उद्देश सांगीतला. याप्रसंगी संस्थेच्या संचालिका स्वाती पाटील, शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी, नागरिक विद्यार्थी -विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा