#महापरिनिर्वाण दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी ने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 56 रक्तदात्यांनी #रक्तदान_करून_महामानवास_केले_अभिवादन...
टेंभूर्णी- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी टेंभूर्णी माढा लोकसभा विभाग जिल्हा सोलापूर यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान टेंभूर्णी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस पुष्प फुले पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करून रक्तदानास सुरुवात करण्यात आली.यावेळी टेंभुर्णी पंचायत समितीचे प्रतिनिधी वैभव कुटे, टेंभुर्णी प्रेस क्लब चे अध्यक्ष अनिल जगताप, टेंभुर्णी प्रेस क्लबचे उपाध्यक्ष सतीश चांदगुडे, पत्रकार गणेश चौगुले, मारूती वाघ, विष्णू बिचुकले यांनी रक्तदात्यांना भेट दिली.
यावेळी जिल्हा अध्यक्ष राहुल चव्हाण, महासचिव विशाल नवगिरे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष रोहित खंडागळे युवक जिल्हा उपाध्यक्ष विशाल मिसाळ ,मिलिंद पालके ,गौतम कांबळे ,विक्रम खरात ,किरण कांबळे, नितीन कांबळे आरुष सरवदे ,शुभम शिरसाट, राजू वाघमारे ,लखन भोसले ,योगेश वाघमारे ,राजू खरात, प्रदीप थोरात, रोहित जगताप, समाधान लांडगे ,सोमा लोंढे, सागर सरोदे लखन गवळी, प्रशांत लोंढे विशाल लोंढे ,विकी लोंढे, सर्जेराव लोंढे ,नयन साळवे समाधान कांबळे ,अजित ओहोळ आदी. सदर शिबिर पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा