जीवनात संघर्ष या शब्दाला महत्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे- सुरज देशमुख
श्री शारदे गुरुकुल चा ओरिसातील कलिंगा इन्स्टिट्यूटचा अभ्यास दौरा .
कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )
श्री शारदे गुरुकुल , टेंभुर्णी चे सचिव हर्षवर्धन देशमुख, संचालक सुरज देशमुख, कार्यकारी संचालक प्रियांका देशमुख यांनी शालेय व्यवस्थापना संबंधी ओरिसा येथील कालिंदा इस्टेटला अभ्यास दौऱ्यासाठी भेट दिली .त्यावेळी तेथील अनुभव सांगताना सुरज देशमुख बोलत होते.
पुढे ते म्हणाले की , प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ म्हणजेच परदुःख दूर करण्यासाठी झटणारे ग्रेट व्यक्तिमत्व म्हणजे आसामचे खासदार डॉ.अच्युत सामंत हे होत.सामंत याचं बालपण तसे खूप खडतर आणि गरीब परिस्थिती गेले. लहान वयातच सरांचे पितृछत्र हरपल्याने उदरनिर्वाहासाठी आईसोबत आणि भावंडांसोबत पडेल ते आणि मिळेल ते काम करून कशीबशी गुजराण करत असतानाच गावातल्या शाळेतील शिक्षकांनी त्यांना शाळेत दाखल करून घेतले. त्यातूनच त्यांना शिक्षणाची आवड निर्माण झाली व पुढे जाऊन पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. काही काळ कॉलेज मध्ये लेक्चरर म्हणून कामही केले.
स्वतःचे बालपण असे खडतर आणि कष्टातून उभे राहिल्यानंतर समाजातील असे खूप घटक आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत तसेच गोरगरीब आणि अनाथ मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सामंत सरांनी कलिंगा इन्स्टिट्यूट अँड इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी आणि कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस यांची स्थापना केली. त्यांनी स्थापन केलेल्या युनिव्हर्सिटी आणि कॉलेज मध्ये भारतातील आणि जगभरातील लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच ३०००० हून जास्त गरीब विद्यार्थ्यांना विनामुल्य शिक्षण आणि इथे राहण्यासाठीची सोय केली आहे. त्यांना KG पासून पदवी व पुढे डॉक्टरेट पर्यंत शिक्षण उपलब्ध करून दिले आहे.
क्रीडा क्षेत्रातही राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विद्यार्थी चमकावे यासाठी इथे क्रीडा शिक्षण दिले जाते. डॉ.अच्युत सामंत सर स्वतः व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात बरोबरच सर ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य, मूलभूत सुविधा यावर भरीव योगदान देत आहेत. लोकांचे प्रश्न अडीअडचणी समजून तेवढ्याच तत्परतेने आणि आपुलकीने सोडवत आहेत. त्यामुळेच लोकांनीही त्यांना कंधामल,ओडिशा लोकसभा मतदारसंघाचे खासदार म्हणून निवडून दिले आहे. सामंत सर कला,साहित्य, क्रीडा,समाजसेवा अशा सर्वच क्षेत्रात नेहमीच त्यांचे योगदान देत आहेत.मीडिया क्षेत्रातही त्यांना कलिंगा टी.व्ही आणि कलिंगा न्यूज ओडीसा चॅनलचे संस्थापक म्हणून पाहिले जाते. त्यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी ५० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत व २०० हून अधिक राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ओडिशा भेटीदरम्यान सरांचे हे विस्तृत कार्य पाहण्याचे आम्हाला भाग्य लाभले. सरांनी त्यांच्या जीवनात ज्यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. अशा स्वतःच्या आईवर असणारे स्वलिखित माय मदर माय हिरो हे पुस्तक आम्हाला देऊन आमचा सन्मान केला. एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या हातून हा सन्मान स्वीकारताना नक्कीच अत्यानंद झाला.त्यांचे हे अफाट सामाजिक आणि शैक्षणिक कार्य नक्कीच आम्हाला प्रेरणा देणारे ठरले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा