Breaking

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०२२

तुळजापूर येथे प्रहार संघटनेच्या वतीने भव्य दिव्य आनंदोत्सव साजरा*




*तुळजापूर येथे प्रहार संघटनेच्या वतीने भव्य दिव्य आनंदोत्सव साजरा*



प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

आमचे दैवत वंदनीय माजी राज्यमंत्री मा. आमदार श्री बच्चू भाऊ कडू गेल्या 25 ते 30 वर्षांपासून लढत असलेल्या लढ्यास यश देशातीलच नव्हे तर जगातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात झाल्यामुळे आज तुळजापूर प्रहार संघटनेच्या वतीने भव्य दिव्य आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सर्व दिव्यांग बांधवांना लाडू भरवून मोठ्या आनंदाने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री शशिकांत मुळे, महादेव चोपदार, महेश माळी,शशिकांत गायकवाड,अनिल महाबोले व नागेश कुलकर्णी सर्व प्रमुख पदाधिकारी व प्रहार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा