राज्यपालांचा राजीनाम घेऊन पंतप्रधानांनी यांनी महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावनेचा आदर करावा - शंभूराजे फरतडे
करमाळा प्रतिनिधी /अलीम शेख मोबाईल नंबर 98 50 68 63 60
राज्यपालांचा राजीनामा घेऊन पंतप्रधानांनी यांनी महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावनेचा आदर करावा असे परखड मत युवासेना तालुकाप्रमुख शंभुराजे फरतडे यांनी व्यक्त केले.
करमाळा येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांचा निषेध करुन छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले त्या वेळे ते बोलत होते. या वेळेस शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर काका लावंड, शहरप्रमुख प्रवीण कटारीया, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, शहरप्रमुख समीर परदेशी, शिवसेना उपशहर प्रमुख संजय भालेराव, पंकज परदेशी शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर लालु करेशी व शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.
या वेळेस अधिक बोलताना फरतडे म्हणाले की आपल्या बेताल वक्तव्यांने सतत महाराष्ट्रातील महापुरुषांचा आनादार करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांचा एकेरी उल्लेख करत ते जुन्या काळातील आदर्श होते,असे वक्तव्य करून महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या भावनांना डिवचले आहे. महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानातील शिवभक्त व मराठी बांधव या प्रकरणाने संतप्त झाले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवभक्तांच्या भावनेचा आदर करुन तात्काळ राजीनामा घेऊन पदमुक्त करावे असे आवाहन केले.
शहर प्रमुख प्रवीण कटारिया यांनी राज्यापाल हे भाजपाचे प्रवक्ते असल्यासारखे वागुण राज्यापाल पदाची गरिमा घालवत आहेत, त्यांना महाराष्ट्रातुन हद्दपार करा व कुठेही त्यांची राज्यापाल म्हणून नेमणूक करु नका असे आवाहन केले.
जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजीमहाराज की जय ,या घोषणांनी भवानी नाका परिसर दणाणून गेला होता. पोलीसांनी या वेळेस चोख बंदोबस्त ठेवला होता.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा