भैरवनाथ शुगर आलेगावचा पहिला हप्ता 2300 रुपये जाहीर
टेंभुर्णी प्रतिनिधी भारत जगताप यास कडून
माढा तालुक्यातील आलेगाव येथील भैरवनाथ शुगरची चालू हंगामातील पहिली उचल 2300 रूपयांप्रमाणे देणार असल्याची माहिती भैरवनाथ शुगरचे चेअरमन प्रा शिवाजीराव सावंत यांनी दिली.
आरोग्यमंत्री प्रा तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली व चेअरमन प्रा शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगरच्या सोनारी, विहाळ, लवंगी, वाशी व आलेगाव या पाचही युनिटच्या माध्यमातून शेतकर्यांच्या ऊसाला चांगला भाव देत ऊस उत्पादक शेतकर्यांना अर्थिक हातभार लावण्याचे काम सावंत परिवार करत आहे.
माढा तालुक्यातील आलेगाव येथील भैरवनाथ शुगरने गेल्या हंगामात २४०० रूपयांचा दर दिला आहे. २०२२-२३ च्या चालू हंगामातील गाळप सुरू झाले असून शेतकर्यांना पहिली उचल 2300 रूपयांप्रमाणे दिली जाणार आहे. शेतकर्यांचा सर्व ऊस गाळपासाठी प्रोग्रामप्रमाणे नेला जाणार असून चांगल्या प्रतिचा ऊसपुरवठा कारखान्यास करावा असे आवाहनही प्रा.सावंत यांनी केले.
शेतकर्यांनी आजपर्यंत दाखवलेल्या विश्वासावरच भैरवनाथ शुगरचे विक्रमी गाळप होईल असे त्यांनी आवर्जून सांगितले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक पृथ्वीराज सावंत यावेळी उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा