ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने 15 नोव्हेंबरला काटा बंद आंदोलन.
कन्हेरगांव दि प्रतिनिधी ( धनंजय मोरे )
मंगळवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता भैरवनाथ कारखान्याचे 2017-18 च्या हंगामाचे 266 रुपये शेतकऱ्यांचे देणे बाकी आहे. हे 266 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करावेत व चालू हंगामाचे ऊस दर हा पहिली उचल 2500 व अंतिम दर हा 3100 रुपये जाहीर करावा या मागण्यासाठी भैरवनाथ शुगर , विहाळ या कारखान्यावर ऊस दर संघर्ष समिती करमाळा व शेतकरी यांच्यावतीने.सकाळी 11 वाजता बेमुदत गेट बंद व काटा बंद आंदोलन करण्यात येणार आहे .
करमाळा तालुक्यातील ऊस दर संघर्ष समितीच्या वतीने.करमाळा तालुक्यातील चारही साखर कारखान्याचा ऊस दर निश्चितीसाठी विट येथे ऊस वाहतूक रोखो आंदोलन केले असता, करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुंजवटे यांनी सांगितले की , तालुक्यातील चारही कारखान्यांचे चेअरमन व एमडी यांची मीटिंग बोलावतो व आपण समंजसपणाने ऊस दराचा तोडगा काढू ,तसे मीटिंग चे नियोजन करून बुधवारी 11 वाजता तहसील कार्यालय येथे मीटिंग घेण्यात आली . या मीटिंगमध्ये कारखान्याचे चेअरमन व एम डी उपस्थित नव्हते . फक्त कमलाई आणि आजिनाथ सहकारी साखर कारखान्याचे चे एमडी हजर होते. इतर दोन मकाई व भैरवनाथ यांचे कामगार भाव ठरविण्यासाठी आले होते. या गोष्टी कारखानदार किती सिरियसली घेत आहेत , हे यातून सिद्ध झाले आहे.या कारखानदारांनी करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी व ऊस दर संघर्ष समिती यांना वेड्यात काढले आहे व शेतकऱ्यांची चेष्टा केलेली असल्याचे मत ऊस दर संघर्ष समितीच्या नेत्यांनी व्यक्त केले आहे .
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र गोडगे , रयत क्रांतीचे जिल्हा संपर्कप्रमुख राजकुमार सरडे , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक शिंदे , रयत क्रांती प्रादेशिक सदस्य अजय बागल , बळीराजा जिल्हा अध्यक्ष आण्णासाहेब सुपनवर , स्वाभिमानीचे करमाळा तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके , संदीप तळेकर ,बाळासाहेब गायकवाड , अमोल घुमरे , मराठा सेवा संघाचे माने , बापू फडतडे , बापू वाडेकर ,अशोक लवंगारे. मारुती निळ उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा