*सापटणे टें.हद्दीत बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात महिला जखमी*
टेंभुर्णी प्रतिनिधी
सापटणे टें. ता.माढा येथे सापटणे तलाव परिसरात आज सकाळपासून बिबट्या सदृश्य प्राण्याच्या हल्ल्यात तीन जनावरे तसेच एक महिला शेतात जात असताना अचानक झालेल्या हल्ल्यात जखमी झाल्या असुन या घटने मुळे सापडणे,वेणेगाव,अकुंभे,पालवान, पिंपळनेर, अकोले बु! या परीसरात खळबळ उडाली असुन या भागातील ९० टक्के ऊसाचे क्षेत्र असलेल्या मुळे वनविभागाने तातडीने लक्ष देऊन बिबट्या सदृश्य प्राण्याचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे . आज झालेल्या महिलेवर ती हल्ल्यात सापडणे परिसरातील

नर्मदा उत्तम करळे (वय 62 ) राहणार सापडणे तालुका माढा असुन ती महीला जखमी झाल्या असुन त्यांना तातडीने उपचार घेण्यासाठी टेंभुर्णी येथील डाॅ.पाटील हाॅस्पीटल येथे आणण्यात आले असून त्यांच्यावरती सध्या उपचार चालू आहेत तरी प्रशासनाने व विन वनविभागाने तातडीने लक्ष देऊन बिबट्या सदृश्य प्राण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा