Breaking

रविवार, २ ऑक्टोबर, २०२२

महिलांनी प्रत्येक शासकीय दवाखाण्याला आपले माहेर समजावे-मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे


महिलांनी प्रत्येक शासकीय दवाखाण्याला आपले माहेर समजावे
-मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे


नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

किनवट : महिला ही संपूर्ण घराची तसेच आपल्या संपूर्ण कुटूंबाची काळजी घेत असते. आपली काळजी कुणी घेणार नाही हे तीला माहिती असून सुद्धा आपले कर्तव्य ती पार पाडत असते. म्हणून आजच्या या आधुनिक युगात आपण स्वतः नवदुर्गा बनुन आपल्या स्वतःची काळजी घेऊन आपण स्वतः व आपले बाळ कसे निरोगी राहील यावर जास्त भर द्यावा. आपल्या शासकीय यंत्रणा आपल्या सेवेसाठी तत्पर असुन प्रत्येक महिलेने दवाखाण्यात जाऊन उपचार घ्यावे.  प्रत्येक शासकीय दवाखान्याला आपले माहेर घर समजावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केले. 
        महाराष्ट्र शासन सार्वजनीक आरोग्य विभाग , नांदेड जिल्हा परिषद यांच्या वतीने "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" हे आभियान 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येत आहे. यानुषंगाने आरोग्यवर्धिनी उपकेंद्र , कमठाला येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निना बोरांडे , गट विकास अधिकारी सुभाष धनवे , गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने , उप विभागीय अभियंता किशोर संद्री , माहूरचे तालुका आरोग्य आधिकरी डॉ. संदेश जाधव, सरपंच अनुसया तडसे मंचावर उपस्थित होते. तालुका आरोग्य आधिकरी डॉ. संजय मुरमुरे यांनी प्रास्तविक केले. उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले. भुरे यांनी आभार मानले. 
           वैद्यकीय अधीकारी डाॅ.आईटवार
वैद्यकीय अधिकारी डाॅ.भाग्यश्री वाघमारे- डुडुळे , आरोग्य सहाय्यक अन्नेलवार , आरोग्य उपकेंद्र कमठालाचे सीएचओ डाॅ.बी.यु.पवार, आरोग्य सेविका  एम.एम.हिवाळे, आर. जी.ढोरे, आशा वर्कर पुणम भरकड, अरुणा गरड यांचा कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महिला कर्मचारी व गावातील गरोदर माता, स्तनदा माता यांची ओटी भरण्यात आली. 
         प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व महिला अधिकारी कर्मचारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांचा साडी चोळी भेट देऊन दोन वर्ष यशस्वी कारकिर्दीचा गौरव केला. प्रारंभी जिल्हा परिषद केंद्रिय प्राथमिक शाळा कमठाला शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत गाईले.
           यावेळी केंद्र प्रमुख विजय मडावी , मुख्याध्यापक शरद कुरूंदकर, नागरिक शिवाजी पाटील कऱ्हाळे, लक्ष्मण देवसरकर, मारोती सुरोशे, बालाजी भरकड , मारोती भरकड, कैलास पाटील कऱ्हाळे, सामाजिक कार्यकर्ते घनश्याम पाटील कऱ्हाळे, मारोती बराटे, वैभव गेडाम, कुलदीप उरकुडे, पंडित भरकड, गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      यावेळी स्त्री रोग तज्ज्ञ अनिल राठोड यांनी सर्व महिलांची एचबी, शुगर, ब्लड, थायरॉईड आदि बाबींची आरोग्य तपासणी   केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा