टेंभुर्णी येथे विजेचा शॉक लागून गणेश भक्ताचा मृत्यू
टेंभुर्णी , प्रतिनिधी
येथील कसबा गल्ली या ठिकाणी असणाऱ्या एका गणेश मंडळाचे शटर असताना, उघडत विजेचा शॉक लागून मोबीन अजीज आतार (वय. १८) या गणेश भक्ताचा झाला. मृत्यू
याबाबत अधिक माहिती असे की टेंभुर्णी येथील कसबा गल्ली मध्ये काही नवयुकांनी एका गाळ्यामध्ये गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या गळ्याच्या शटरला लागून लाईटची वायर गेलेली होती.३ सप्टेंबर रोजी
दुपारच्या सुमारास गणेश भक्त मोबिन आजिज आतार हा - त्या गळ्याचे शटर उघडत असताना त्याला विजेची वायर खराब झाल्याने शटर मध्ये करंट उतरून विजेचा जोरदार शॉक बसला. व त्यामध्ये मोबिन याचा मृत्यू झाला. मोबिन हा टेंभुर्णी येथील पाटील हॉस्पिटलमध्ये काम करत होता. त्याच्या पश्चात आई-वडील, बहीण व भाऊ असा परिवार असून. गणेशोत्सवाच्या काळामध्ये गणेश भक्ताचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने टेंभुर्णी व परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा