सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याकडून ३१.५४ कोटी रुपयांचे पेमेंट बँकेत वर्ग.
श्रीगोंदा-नितीन रोही,
तालुक्यातील सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन २०२१-२२ या गळीत हंगामात गाळप केलेल्या ऊसासाठी १८४.८५ रुपये प्र. मे. टनाप्रमाणे पेमेंट बँकेत वर्ग केले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी दिली.
नागवडे कारखान्याने गाळप हंगाम सन २०२१-२२ मध्ये ८ लाख ९४ हजार ६३० मे. टनाचे गाळप केले असुन या गळीत हंगामात १०.६४ टक्के साखर उतारा मिळालेला आहे. त्यानुसार २०२१-२२ गळीत हंगामाची कारखान्याच्या १०.६४ टक्के साखर उताऱ्यानुसार रुपये २४३४.८५ प्र.मे. टनाप्रमाणे एफ. आर. पी. आहे. कारखान्याने यापुर्वी २२५० रुपये प्र. मे. टनाप्रमाणे ऊस पेमेंट सभासद शेतकऱ्यांना अदा केलेले असुन आज १८४.८५ रुपये प्र.मे. टनाप्रमाणे १६.५४ कोटी रुपये संबंधीत ऊस उत्पादक सभासद व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करणेत आली आहे. त्याच प्रमाणे ऊस तोडणी वहातुकदारांचे १५ कोटी असे एकुण ३१.५४ कोटी रुपयांचे पेमेंट बँकेतील त्यांच्या खात्यात वर्ग करणेत आले असुन उर्वरीत पेमेंट दिवाळीपुर्वी देणार आहोत अशी माहिती राजेंद्रदादा नागवडे यांनी दिली.
येत्या २०२२-२३ गळीत हंगामाकरीता आज अखेर ४९०० हेक्टर ऊस क्षेत्राची नोंद कारखान्याकडे झालेली असुन काही शेतकरी ऊस नोंद देण्यामध्ये हलगर्जीपणा करतात व त्यामुळे त्यांची नोंद राहून जाते. त्याचा परिणाम ऊस तोड नियोजनावर होतो व ऊस तोडणी प्रोग्राममध्ये अडचणी निर्माण होतात. तरी सर्व सभासद शेतकऱ्यांनी आपल्या ऊसाच्या नोंदी आपल्या गट कार्यालयामध्ये देण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन राजेंद्रदादा नागवडे यांनी केले आहे. यावेळी नागवडे कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक नाईक उपस्थित होते.
फोटो,


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा