तुळजापूर नगरपरिषद पाणीपट्टी वसुली साठी कडक मोहीम राबवणार.-मुख्याधिकारी श्री अरविंद नातू.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
तुळजापूर शहरातील नागरिकांकडून नगर परिषद तुळजापूर पाणीपट्टीची 1 कोटी 27 लक्ष रुपये इतकी थकबाकी असून, शहरातील पाणीपुरवठा योजनेचा खर्च भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न वाढवणे आवश्यक असल्याने शिवाय विद्युत बिलाचा दरमहा येणाऱ्या खर्च भागवणे अशक्य होतं असल्यामुळे तुळजापूर नगरपरिषद तुळजापूर शहरातील थकबाकीदारांकडून थकीत रक्कम वसुलीसाठी कडक पावले उचलणार असून, यामध्ये पाणी पुरवठा कनेक्शन बंद करणे अनाधिकृत नळ नियमाप्रमाणे दंडाची आकारणी करून नियमित करणे अथवा विनापरवाना नळ जोडण्या धारकांवर फौजदारी गुन्हे नोंद करणे इ. कार्यवाही करणार आहे. याशिवाय ज्या थकबाकीदारां कडून रक्कम भरली जाणार नाही त्यांची महाराष्ट्र नगरपालिका नगरपरिषदा व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील कलम 152 च्या तरतुदीनुसार जंगम मालमत्ता जप्त करून, त्याचा जाहीर लिलाव करून येणाऱ्या रकमेतून थकीत रक्कम वसूल करण्याची कार्यवाही करणार आहे याची तुळजापूर शहरातील थकबाकीदारांना नोंद घ्यावी व आपली थकित रक्कम भरून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन मुख्याधिकारी श्री अरविंद नातू यांनी तुळजापूरकर वासियांना केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा