मढेवडगाव सोसायटीची कर्जवाटप प्रक्रिया अत्यंत पारदर्शक व सुलभ अध्यक्ष- वाबळे......
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न....
श्रीगोंदा:नितीन रोही,
तालुक्यातील मढेवडगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी मध्ये संस्थेच्या कुठल्याही सभासदाला कर्ज घेण्यासाठी चेअरमन किंवा संचालक यांच्या दारात जावे लागत नसून, संस्थेचा सभासद संस्थेचे कर्ज वेळेत घेतो व वेळेत भरतो त्या सभासदाला सोसायटीमध्ये तात्काळ कर्ज मंजुरी देऊन पुन्हा कर्ज वाटप करण्यात येते यामध्ये संस्थेचे संचालक कुठल्याही प्रकारचा भेदभाव करत नाही
परंतु काही सभासद स्वतः थकबाकीत आहेत पण संस्थेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सातत्याने संस्थेची बदनामी करण्यासाठी खोटेनाटे आरोप संस्थेवर व संचालकावर करून संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. संस्थेची कर्जवाटप धोरणे जिल्हा बँकेच्या परिपत्रकानुसार चालतात. म्हणून दिनांक 26/ 11/ 2021 रोजी च्या जिल्हा बँक परिपत्रकानुसार जे सभासद सन 2021- 22 सालचे वसूलास पात्र कर्जापैकी 31/3/2022 चे परतफेड असलेले कर्जाची संपूर्ण वसुली त्याचबरोबर सन 30/6/22 सालचे वसूल पात्र कर्जाची संपूर्ण वसुली झाली असावी आशा सभासदांनाच परत पशु खाद्य वाटप किंवा इतर कर्ज वाटपास जिल्हा बँकेच्या परिपत्रकानुसार मंजुरी मिळालेली आहे. त्यानुसार संस्थेने आजपर्यंत ज्या सभासदाने वसुलास पात्र कर्जाचा भरणा केलेला आहे अशा सर्व सभासदांना तात्काळ नवीन कर्ज वाटप केलेले आहे त्यामुळे संस्थेतील कुठलेही सभासदाची कोणत्याही प्रकारची अडवणूक संस्थेचे पदाधिकारी किंवा कर्मचारी करत नसून विरोधक हे केवळ खोट्या प्रसिद्धीसाठी एक नाटककार कंपनी प्रमाणे सातत्याने दिशाभूल करून वेगवेगळ्या पद्धतीने आरोप करण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यांच्या आरोपांमध्ये कुठलेही तथ्य नाही.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा