जिल्हा परिषदेच्या शाळेने केला अपंगांचा सत्कार...
श्रीगोंदा-नितीन रोही,
सविस्तर असे की दिनांक ३०-४-२०२२ रोजी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रेरणेने श्रीगोंदा तालुक्यातील शिरसगाव ग्रामपंचायत हद्दीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अपंग संघटनेच्या वतिने प्रहार अपंग संघटना प्रभारी तालुकाअध्यक्ष राजेंद्र पोकळे यांनी कम्प्युटर मॉनिटर शाळेला भेट दिले. याप्रसंगी शाळा व्यावस्थापन समिती,प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार मिलिंद कुलथे साहेब,नायब तहसीलदार डॉ.योगिता ढोले,पंकज नेवसे,गटविकास अधिकारी गोरख शेलार, जगताप साहेब,सुरेश गलांडे,डॉ.सोमनाथ देवकाते,रामभाऊ पाचपुते, रज्जाक शेख,बापू रंधवे,महेश शेळके, संदीप सूर्यवंशी,सचिन तोडकर उपस्थित होते.शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार अपंग संघटनेच्या तालुका अध्यक्ष राजेंद्र पोकळे यांच्या अध्यक्षतेखालील अपंग व्यक्तीचे स्वागत करीत सत्कार करण्यात आला.राष्ट्रपती पुरस्कार विजेते आणि मुख्याध्यापक ठाकर सर यांनी कार्यक्रमा निमित्त सर्वांचे आभार मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा