सर्विस स्टेशन पंपाद्वारे गावोगावी, रस्त्यावर,शेतात, चौकात पेट्रोल- डिझेल इंधन पुरवठा होणार ....
आमदार बबनदादा शिंदे
बेंबळे। प्रतिनिधी।
शेतकऱ्यासाठी यापुढे 'सर्विस स्टेशन पंप' सुरू होणार असून याद्वारे पहिजे त्या ठिकाणी प्रत्येकाला त्याच्या मागणीनुसार घरोघर, रस्त्यावर चौकात, शेतात डिझेल पेट्रोल इंधन पुरवण्यात येणार आहे. सर्विस स्टेशन पंपाची गाडीमध्ये, ग्राहकाने मागणी केल्यानुसार मिटर रिडींग व इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे इंधन मिळण्याची व्यवस्था केलेली आहे व यासाठी कोणतेही जादा पैशाची आकारणी न होता स्थानिक पंपावरील दराप्रमाणे ग्राहकांना इंधन पुरवठा होणार आहे. या घरोघर जागेवर इंधन पुरवठा व्यवस्थेमुळे शेतकरी शेतमजूर व ग्रामीण जनता यांना पंपा पर्यंत जाण्याचा त्रास, तसेच तेवढ्या अंतरचे निष्कारण भुर्दंड बसणार नसून जागेवरच वेळेवर इंधन मिळाल्यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे व नियोजित कामे वेळेत पूर्ण होतील अशी माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी बेंबळे ता.माढा येथील शिवकृपा सर्विसेस पेट्रोल पंपाच्या उद्घाटनप्रसंगी दिलेली आहे.
या कार्यक्रमासाठी माढा तालुक्याचे सभापती विक्रम दादा शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रमेश पाटील जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे,जि.प. सदस्य अजित तळेकर राष्ट्रवादीचे जिल्हाउपाध्यक्ष युवराज दादा पाटील गंगाधर भोसले डॉक्टर विकास भोसले विश्वजीत भोसले सौ सुषमा भोसले नारायण लोंढे प्रा.औदुंबर लोंढे आदी मान्यवरांसह सर्वश्री चप्पा सत्यनारायण, एस रत्ना सामी, पियुष पाठक, महेंद्र लोकरे आदि संबंधित वरिष्ठ अधिकारी तसेच माजी सरपंच कैलास भोसले माजी चेअरमन संजय पवार हनुमंत अनपट ,पो.स.ई. सुशील भोसले बेंबळे सरपंच विजय पवार कॉन्स्टेबल हजारे राजेंद्र जगताप, दादामालक भगत, सिद्धेश्वर शिंदे दत्तात्रय पाटील विजय फराडे संभाजी कोकाटे डॉक्टर भीमराव पवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार बबनदादा शिंदे व सभापती विक्रम दादा शिंदे यांच्या हस्ते पेट्रोल पंप व कार्यालयाची फित कापून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव भोसले यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून सर्व मान्यवरांचे भोसले परिवारातर्फे स्वागत केले. यावेळी फेटा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. आमदार बबनदादा शिंदे यांनी ग्रामीण भागातील जनतेसाठी पेट्रोल पंपाची सेवा उपलब्ध केल्याबद्दल मार्कंडेय हॉस्पिटल सोलापूरचे बालरोगतज्ञ डॉक्टर विकास भोसले त्यांचे वडील गंगाधर भोसले , बंधू विश्वजीत भोसले व सौ.सुषमा भोसले सौ. सुजाता चोरमल व सोमनाथ चोरमल या सर्वांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास टेंभुर्णी बेंबळे पंढरपूर मोहोळ अकलूज परिसरातील राजकीय सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय परिवारातील अनेक मान्यवर तसेच युवक , प्रतिष्ठित महिला,व्यापारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.यशवंत भोसले व सोमनाथ चोरमल यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा