पीर गायकवाड साहेब बाबा यांचा ऊरुस सालाबादप्रमाणे उत्साहात साजरा.
टेंभुर्णी(प्रतिनिधी)- चव्हाणवाडी येथील जागृत देवस्थान पीर गायकवाड साहेब बाबा यांचे काझी वस्ती येथे देवस्थान असुन प्रत्येक वर्षी येथे ऊरुस(यात्रा) हिंदू-मुस्लिम एकत्र येऊन साजरा करतात. पीर गायकवाड साहेब बाबा यांच्या मजार चे दर्शन घेण्यासाठी अनेक खेड्यापाड्यातील श्रध्दाळू लोक हजेरी लावतात.
सालाबादप्रमाणे याही वर्षी पीर गायकवाड साहेब बाबा यांचा संदल घोड्यावरती काढण्यात आला. ऊरुस दिवशी दिवसभर अन्नदान व प्रसाद ठेवला जातो व संध्याकाळी कव्वाली चा ही कार्यक्रम होतो अनेक लोक कव्वाली ऐकण्यासाठी हजेरी लावतात.
ऊरुस पार पाडण्यासाठी जावेद काझी,आसिफ काझी,कुदरत काझी,साहेबलाल काझी,अस्लम काझी,सुल्तान(राजु) काझी,अल्ताफ काझी,अरिफ काझी,अमिर काझी,जमाल काझी,शरिफ काझी,रमजान काझी,मोनु काझी,जहांगीर काझी,सुरज काझी,शकिल काझी,रियाज काझी,तौफिक काझी यांनी परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा