*श्री माऊली शैक्षणिक संकुलात विज्ञान दिन उत्साहात संपन्न*
*विज्ञानवादी दृष्टीकोन ठेवण्याचे आवाहन*
टेंभुर्णी (ता. माढा) श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ येथे २८ फेब्रुवारी २०२२ रोजी भव्य विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. थोर शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रामन यांनी स्कॅटरिंग ऑफ लाईट चा शोध लावला. हा शोध लावण्यासाठी त्यांनी केलेल्या या अथक प्रयत्नांना २८ फेब्रुवारी १९२८ रोजी यश आले आणि अवघ्या अडीच वर्षातच त्यांच्या या संशोधनाला १९३० सालचा पदार्थ विज्ञान शास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला. त्यांच्या या शोधाच्या स्मरणार्थ २८फेब्रुवारी १९८८ पासून राष्ट्रीय विज्ञान दिन आपल्या देशात साजरा केला जातो .
श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ येथे विज्ञान प्रदर्शनामध्ये वाया घालवल्या जाणाऱ्या कागदाचे प्रमाण, कीटकांमुळे होणारे आजार, कीड नियंत्रण, सोलर सिस्टिम, साऊंड इफेक्ट, शाश्वत शेती, निकोटिन चे परिणाम, प्रदूषण नियंत्रण, ऊर्जा निर्मिती, शेतीची विविध अद्यावत उपकरणे, निरनिराळी सौंदर्यप्रसाधने आणि ग्रामीण भागातील वापर, इंधन समस्या, अशा प्रकारे एकूण 105 प्रकल्प मुलांनी सादर केले होते. त्यांना प्रत्यक्ष वास्तव कळाल्याने विषयाचे गांभीर्य कळत आहे. अशा प्रकारे विविध प्रकारचे प्रकल्प या विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाले होते. यामध्ये पहिली ते चौथी च्या गटात प्रथम क्रमांक व्हॅक्युम क्लिनर, द्वितीय क्रमांक हायड्रॉलिक जेसीबी, तृतीय क्रमांक वर्किंग ऑफ लंग्स, तर पाचवी ते बारावी च्या गटात प्रथम क्रमांक मल्टीपर्पज अॅग्रीकल्चर मशीन, द्वितीय क्रमांक अब्सॉर्प्शन ऑफ नायट्रोजन डाय ऑक्साईड अँड कार्बन डायऑक्साईड, तृतीय क्रमांक झिरो एनर्जी कुल चेंबर, चतुर्थ क्रमांक एअर गन तर पाचवा क्रमांक हा सेफ्टी मास्क या प्रोजेक्ट ना मिळाला.
यावेळी श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष योगेश बोबडे संस्थेच्या सचिव सुरजा बोबडे तसेच लक्ष्मी आनंद विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य कांबळे सर उपप्राचार्य सोनल शेवतेकर मॅडम, सनराईज इंग्लिश मेडियम चे प्राचार्य गणेश पालवे,ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख प्रमोद ननवरे सर, कॉर्डिनेटर पठाण सर, अजय शिंदे सर, अर्जुनसिंह रजपूत सर, पी.आर.ओ. सागर खुळे सर विज्ञान प्रदर्शन विभाग प्रमुख प्रतिक पांढरे सर व आदि. शिक्षक उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश पालवे सर यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल जळकोटे यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा