Breaking

मंगळवार, २२ मार्च, २०२२

शिवसेनेच्या वतीने शिवजयंती श्रीगोंद्यात उत्सवात साजरी*


शिवसेनेच्या वतीने शिवजयंती श्रीगोंद्यात उत्सवात साजरी



श्रीगोंदा-नितीन रोही,

  शिवसेना युवासेना यांच्या वतीने एकच अधिकृत शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या  प्रतिमेचे पूजन श्रीगोंदा-नगर विधानसभा संपर्कप्रमुख संजय खंडागळे,तहसीलदार  मिलिंद कुलथे साहेब, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, नगराध्यक्ष शुभांगी पोटे यांच्या शुभहस्ते झाले.
दिवसभर विविध कार्यक्रमाने शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला,सायंकाळी साडेपाच वाजता शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे सर यांच्या शुभहस्ते मिरवणुकीचा शुभारंभ झाला.यावेळी संपर्कप्रमुख संजय खंडागळे,नगर तालुका प्रमुख राजेंद्र भगत,महिला तालुका प्रमुख मनिषा काळे यांची उपस्थिती होती,या शिवजयंती उत्सवा साठी तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवजयंती शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे, शहर प्रमुख संतोष खेतमाळीस, हरिभाऊ काळे, सुरेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली ही शिवजयंती आयोजित करण्यात आली होती या शिवजयंती मध्ये शिवसेना उपतालुका प्रमुख निलेश साळुंखे युवा सेना तालुका प्रमुख निलेश गोरे शिवसेना शहर प्रमुख ओमकार शिंदे सागर बापू शेठ माने पत्रकार चंदन घोडके पत्रकार राजू शेख पत्रकार अंकुश तुपे,सागर खेडकर, सुशांत काळे नितीन गायकवाड अनिल सुपेकर  यांच्या सह मोठ संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा