Breaking

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

जि. प .प्रा. शा. वसंतनगर नळदुर्ग येथे राष्ट्र संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी


जि. प .प्रा. शा. वसंतनगर नळदुर्ग येथे राष्ट्र संत सेवालाल महाराज यांची जयंती साजरी      


प्रतिनिधी:- अजित चव्हाण
          
नळदुर्ग:-  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वसंतनगर नळदुर्ग तालुका तुळजापूर येथे आज दिनांक 15 फेब्रुवारी 2022 रोजी जगतगुरु राष्ट्र संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त शाळेमध्ये शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रवि माणिक राठोड आणि बंजारा नायक यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रवि माणिक राठोड उपाध्यक्ष रेशमा राठोड तसेच शालेय समितीचे सर्व सदस्यांच्या हस्ते शालेय गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक श्री लक्ष्मण चव्हाण,सौ. विमलबाई राठोड आणि मुख्याध्यापक श्री आर. आय. औसेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रवि माणिक राठोड उपाध्यक्ष सौ रेशमा मोहन राठोड ज्येष्ठ समाजसेवक श्री लक्ष्मण चव्हाण शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि बंजारा समाजातील गोर  नायक, बंधू-भगिनी,तरुण तसेच शाळेतील सर्व शिक्षक, पोषण आहार कर्मचारी इ. मोठ्या संख्येने उपस्थित  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा