*श्री माऊली शिक्षण संस्थेत शिवजयंती उत्साहात साजरी*
टेंभुर्णी.( ता. माढा) श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित लक्ष्मी-आनंद विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, टेंभुर्णी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवजन्मोत्सव सोहळा अत्यंत आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला. अखंड हिंदुस्थानात ज्या रयतेची व स्वराज्याची जीवापाड काळजी घेणाऱ्या शिवाजी महाराजांच्या व जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. इयत्ता पहिली ते चौथीच्या लहान मावळ्यांनी शिवाजी महाराजांच्या पोषाखा मध्ये येऊन वातावरण प्रफुल्लित केले. सायली पवार,अनुष्का पवार, वैष्णवी शिखरे, पल्लवी व्यवहारे, सृष्टी चव्हाण यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रावर आधारित पोवाडा सादर केला. आयुष भोसले, शुभम वाघे, आदित्य लोकरे, भाग्यश्री राऊत, सिद्धी तळे, कुणाल कोथमिरे, श्रुती शिंदे, राजवर्धन लोकरे, प्रणिता डोंगरे, शिवानी क्षीरसागर, स्वराज भोसले, ऋतुजा जगताप या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित, त्यांचे गुण, त्यांची कौशल्ये व त्यांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून मनोगत व्यक्त केले. शिवाजी महाराजांची युद्धनीती, रणनीती, त्यांचे मावळे व नेतृत्व असे मनोगत अमर काळे सर यांनी व्यक्त केले. शिवाजी महाराजांचे विविध गुणविशेष याबाबद्दल उपप्राचार्य शेवतेकर मॅडम यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमामध्ये भाषण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून उपस्थित असणारे दशरथ देशमुख महाराज यांनी बक्षीस रुपी रक्कम देऊन कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रणिता कदम यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का पवार व वैष्णवी शिखरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नौशाद पठाण यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा