Breaking

गुरुवार, १७ फेब्रुवारी, २०२२

शिवजन्मोत्सवानिमीत्त डॉ.साहेबराव मोरे यांना मराठा भुषण पुरस्कारजिजाऊ रत्न पुरस्कार जिजाबाई लाठकर यांना तर डॉ.रख्माबाई सावे पुरस्कार डॉ.स्मिता कदम यांना जाहीर


शिवजन्मोत्सवानिमीत्त डॉ.साहेबराव मोरे यांना मराठा भुषण पुरस्कार


जिजाऊ रत्न पुरस्कार जिजाबाई लाठकर यांना तर डॉ.रख्माबाई सावे पुरस्कार डॉ.स्मिता कदम यांना जाहीर

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

       मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व इतर कक्ष आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव नवा मोंढा नांदेड समितीच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्य असलेल्यांना १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सवाच्या कार्यक्रमात पुरस्कार दिला जातो.यावर्षीचा मराठा भुषण पुरस्कार डॉ साहेबराव मोरे, जिजाऊ रत्न पुरस्कार जिजाबाई लाठकर, डॉ रख्माबाई सावे पुरस्कार डॉ स्मिता कदम आदिंना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे असे शिवजन्मोत्सव समिती च्या वतीने कळविण्यात आले आहे.
         मराठा सेवा संघ महाराष्ट्रातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात छ शिवरायांचा जन्मोत्सव १९ फेब्रुवारी रोजी साजरा करते त्याचप्रमाणे नांदेड शहरात मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व इतर कक्षाच्या वतीने दरवर्षी शिवजन्मोत्सव साजरा केला जातो.त्या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण, उद्घाटक खा प्रताप पाटील चिखलीकर,खा हेमंत पाटील,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर,आ माधव जवळगावकर,आ मोहन हंबर्डे,आ बालाजी कल्याणकर,आ.अमर राजुरकर,आ.राम पाटील रातोळीकर,आ राजेश पवार ,आ शामसुंदर शिंदे,आ.तुषार राठोड,आ.भिमराव केराम,आ जितेश अंतापुरकर  व इतर पक्षाचे, सामाजिक संघटनाच्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते तीन पुरस्कार दिले जातात.यावर्षी वैद्यकीय क्षेत्रातील गेल्या अनेक वर्षाच्या सेवेची दखल घेऊन मराठा भुषण पुरस्कार डॉ साहेबराव मोरे यांना,आय पी एस असलेले संजय लाठकर हे सध्या पोलीस उपमहासंचालक पदावर आहेत,नाशिक येथे विभागीय सह निबंधक पदावर असलेल्या ज्योती लाठकर-मेटे,बी इ सिव्हील क्षेत्राचे शिक्षण घेऊन उद्योग क्षेत्रात नवारूपास आलेले नितीन लाठकर असे तीन रत्न घडवणार्या जिजाबाई आनंदराव लाठकर यांना जिजाऊ रत्न पुरस्कार तर महिला डॉक्टर क्षेत्रात सामाजिक हीत जोपासात रूग्णांची सेवा करणार्या डॉ स्मिता संजय कदम यांना डॉ रख्माबाई सावे पुरस्काराने शनिवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सन्मानित करण्यात येणार आहे.त्याचबरोबर शाहीर सुधीर पळशीकर यांचा शाहीरी जलसा तसेच छ शिवरायांची राज्यव्यवस्था आणि आजचा भारत या विषयावर प्रा प्रेमकुमार बोके यांचे व्याख्यान ही यावेळी होणार आहे.तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती चे मार्गदर्शक इंजिन शे रा पाटील,शिवाजी खुडे,प्रा डॉ पंजाब चव्हाण,महर्षी डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद प्रदेश महासचिव व्यंकटराव जाधव,अध्यक्ष संकेत पाटील, स्वागताध्यक्ष सुभाष कोल्हे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष उद्धव सुर्यवंशी,मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर, सतिश जाधव,रमेश पवार,शिवजन्मोत्सव समिती चे सचिव पि के कदम,संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शाम पाटील कुशावाडीकर, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम,जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष डॉ विद्या पाटील, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरुणा जाधव, महर्षी डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे शिवाजी पाटील व जिल्हाध्यक्ष भाऊराव कानोले,विर भगतसिंग विद्यार्थी परिषद जिल्हाध्यक्ष इंजि प्रवीण जाधव आदिंसह इतरांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा