*तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच*
तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२, रोजी परत एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली, सदर मोहीमेत बस स्थानक रस्ता, शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर,भवानी रोड,महाद्वार रोड, उस्मानाबाद रोड या भागातील अतिक्रमणे हटविण्यात आली,सदर अतिक्रमण हटाव मोहीम उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक श्री.योगेश खरमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व मुख्याधिकारी श्री.हरीकल्याण येलगटे यांच्या सुचनेनुसार राबविण्यात आली
.
सदर मोहिम यशस्वी होण्यासाठी, कार्यालय अधीक्षक वैभव पाठक, करनिर्धारक रणजित कांबळे,स्वच्छता निरीक्षक दत्ता साळूंके,विश्वास मोटे,व श्री.गुणवंत कदम,बिटप्रमुख सह तुळजापूर नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते
.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा