*तुळजापूर येथील पाचुंदा तलावात अपघाताचा बनाव करणारा ट्रक चालकच निघाला मुख्य आरोपी,*
*AJ 24 Taas News Maharashtra Network-प्रतिनिधी-/रुपेश डोलारे उस्मानाबाद
दिनांक १७ जानेवारी २०२२, रोजी पहाटे ४:००, वाजण्याच्या सुमारास पोलिस कंट्रोलच्या ११२, नंबरवर कॉल आला की, तुळजापूर जवळ लातूर रोड वरील पाचुंदा तलावात एक ट्रक जाऊन अपघात झाला आहे, त्यावरून पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली, ट्रक ड्रायव्हरने झोप लागल्याने ट्रक तलावात गेल्याचे सांगितल्याने सदरची घटना संशयास्पद वाटली, त्यावरून सदर इसमाकडे अधिक विचारपूस केली असता, त्यांनी सांगितले की, सदर ट्रकमधील पायोनर डिस्टीलिरीज बाळापूर जिल्हा नांदेड येथून म्याकडॉल नंबर वन, व्हिस्की११००, बॉक्स सभंर्गी ट्रेडर्स कोल्हापूर यांना देण्यासाठी निघाले होते, त्यापैकी काही बॉक्स मागेच काढून विकले असून, ते ओळखू येऊ नये म्हणून बनावट अपघात दाखवून, पूर्ण माल अपघातात फुटल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न करीत होते, त्यावरून तात्काळ एक टीम मुखेड जिल्हा लातूर येथे पाठवून विकण्यासाठी दुसऱ्या ट्रक मध्ये ठेवलेले ४१५ बॉक्स आरोपीकडून हस्तगत केले आहे, अपघातात झालेला ट्रक क्रमांक TS.18.T. 56 23. हा पाण्यातून बाहेर काढण्यात आला,
सदर ट्रकची व त्यामधील मालाचे नुकसान झाले आहे, रॉयल ट्रान्सपोर्ट नांदेड ट्रक मालक जुनेद शेख, व ट्रक ड्रायव्हर रमेश खरकाडे, व अनिल हिमगिरे यांनी वरील मालाची परस्पर विल्हेवाट लावून अपघात झाल्याचे दाखविण्याचा बनाव केला आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तुळजापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार लक्षात आला असून, पुढील अधिक तपास तुळजापूर पोलीस स्टेशनचे निरीक्षक आजिनाथ काशीद हे करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा