Breaking

रविवार, ३० जानेवारी, २०२२

कोरोना मुक्तीचा संदेश देणाऱ्या 'देवांशू' चा भाजपा कडून उस्मानाबादेत गौरव*


*कोरोना मुक्तीचा संदेश देणाऱ्या 'देवांशू' चा भाजपा कडून उस्मानाबादेत गौरव*



प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


 उस्मानाबाद :-  वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून गड-किल्ले सर करून कोरोना मुक्तीचा संदेश देणाऱ्या देवांशू चा उस्मानाबादेत भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने गौरव करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अष्टपैलू देवांशु क्षिरसागर यांचा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सोलापुर येथिल देवांशुचा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन आज दिनांक ३० जानेवारी रोजी सत्कार करण्यात आला.
      सुधांशुचे वय हे केवळ ८ वर्ष असुन तो इयत्ता ३ री मध्ये शिकत आहे.या बालकाने ३ वेळेस कळसूबाई शिखर २० पेक्षा अधिक गडकिल्ले सर केले आहेत. पंढरपूर, अक्कलकोट,तुळजापूर अशी सायकलची वारी केली आहे.
    आत्तापर्यंत ४५० कि.मीटर सायकल वारी करून गावोगावी कोविड महामारी,पर्यावरण बचाव तसेच सुकन्या योजना संदेश देत जनजागृती करत आहे.
     वयाच्या केवळ ५ व्या वर्षी रायगड किल्ल्यावर शिवराज्यभिषेक सोहळ्यात पोवाडा गायनाचा मान मिळविला आहे.सन्मित्र पुरस्कार,उत्कृष्ठ बाल वक्ता पुरस्काराने सन्मानित,शिवनेरी,वासोटा,राजगड,गडकिल्ले सायकलिंग करत राष्ट्रीय सामाजिक संदेश देत अनेक मोहिमा पुर्ण केल्या आहेत.
        भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे ,भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर ,भाजप शहर सरचिटणीस श्रीराम मुंबरे,युवामोर्चा सरचिटणीस देवकन्या गाडे,युवती जिल्हा संयोजिका पूजा राठोड माऊली यांची यावेळी उपस्थिती होती.
राजसिंहा राजेनिंबाळकर 
जिल्हाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा धाराशिव (उस्मानाबाद ).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा