Breaking

गुरुवार, ६ जानेवारी, २०२२

टेंभुर्णी येथे ट्रॅक्टर मोटरसायकल अपघातात सापटणे( टें )चे अंगत ढवळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू**टेंभुर्णी येथे वेगवेगळ्या अपघातात दोन ठार*



*टेंभुर्णी येथे ट्रॅक्टर मोटरसायकल अपघातात सापटणे( टें )चे अंगत ढवळे यांचा  उपचारादरम्यान मृत्यू*

*टेंभुर्णी  येथे वेगवेगळ्या अपघातात दोन ठार*

टेंभुर्णी (प्रतिनिधी) टेंभुर्णी येथील कुर्डूवाडी चौकात काल सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान ऊसाच्या ट्रॅक्टरने मोटर सायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार  अंगद पांडुरंग ढवळे (वय 55 )रा सापटणे( टें) हे गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मयत झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली .
टेंभुर्णी पोलिसांकडून मिळालेली सविस्तर वृत्त असे की जुन्या सोलापूर -पुणे राष्ट्रीय महामार्गावरून उसाचा ट्रॅक्टर सोलापूर दिशेकडून पुण्याच्या दिशेने जात असताना टेंभुर्णी पोलीस स्टेशन जवळ असलेल्या कुर्डूवाडी चौकात आल्यानंतर कुर्डूवाडी वरून येणाऱ्या मोटरसायकल एम. एच .45 ए.एच.5155 टेंभुर्णी येथील कुर्डूवाडी चौकातून करमाळा चौकाकडे जात असताना ऊसाने भरलेला विना नंबर चा ट्रॅक्टरच्या धडकेने मोटर सायकल स्वार  अंगद पांडुरंग ढवळे हे ट्रॅक्टरच्या धडकेने गंभीर जखमी झाल्याने त्यांना टेंभुर्णी येथे प्राथमिक उपचार करण्यासाठी नेण्यात आले असता त्यांच्यावर किरकोळ उपचार  करून पुढील उपचारासाठी इंदापूर येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले असता त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून दुसरा अपघात काल सायंकाळी आठ वाजता सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर सापटणे पाटीजवळ मोटरसायकल ला अज्ञान वाहनाने धडक दिल्याने मोटरसायकल वरील विनायक सुनील खिल्लारे वय (22) राहणार अकलूज ता. माळशिरस हा जागीच ठार झाला असून दोन्ही घटनेचा तपास पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो ए.एस.आय. गुटाळ  हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा