लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या नळदुर्गच्या श्री खंडोबाची देवाची महायात्रा रद्द.
नळदुर्ग प्रतिनीधी/ अजित चव्हाण-aj24taas News Maharashtra
उस्मानाबाद - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे सलग दुसऱ्या वर्षी नळदुर्गच्या श्री खंडोबाची यात्रा रद्द करण्यात आली आहे. दि. १६, १७ आणि १८ जानेवारी रोजी मंदिर परिसरात संचारबंदी राहणार असून, काही मोजक्या पुजारी आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रथा परंपरेनुसार विधी होणार आहेत. मैलारपूर ( नळदुर्ग ) यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज ( मंगळवार ) रोजी शांतता कमिटीची बैठक तहसीलदार सौदागर तांदळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली, यावेळी हा निर्णय घेण्यात आला. मैलारपूर ( नळदुर्ग ) येथील श्री खंडोबा असंख्य लोकांचे कुलदैवत आहे. त्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यातून किमान पाच ते सात लाख भाविक यात्रेसाठी हजेरी लावत असतात. श्री खंडोबा - बाणाई विवाहस्थळ असल्यामुळे आणि जवळच भुईकोट किल्ला असल्यामुळे यात्रेला मोठी गर्दी असते.
यंदाची यात्रा दि. १६ ते १८ जानेवारी रोजी भरणार होती. १७ जानेवारी रोजी छबिना निघणार होता. मात्र कोरोना महामारीमुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे सलग दुसऱ्या वर्षी यात्रा रद्द करण्यात आली आहे. १६ ते १८ जानेवारी दरम्यान मैलारपूर मंदिराकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. तसेच व्यवसायीकांना दुकान लावण्यास मनाई करण्यात येणार आहे. याबाबत मंगळवारी झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत नियमावली वाचून दाखवण्यात आली. यावेळी पोलीस अधिकारी , आरोग्य विभाग, नगर पालिका कर्मचारी, मानकरी, पुजारी, लोकप्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
धार्मिक विधी पार पडणार
कोरोना महामारीमुळे महायात्रा रद्द करण्यात आली असली तरी सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. १६ ते १८ जानेवारी हे तीन मंदिर परिसरात संचारबंदी लागू करण्यात येणार आहे.नळदुर्ग व अणदुरच्या प्रत्येकी पंचवीस मानक-यांना या काळात पारंपरिक विधी करण्यासाठी प्रवेश देण्यात येणार आहे. यावेळी मैलारपूर मंदिराकडे येणारे सर्व रस्ते भाविकांसाठी बंद करण्यात येणार आहेत. बाहेर गावच्या भाविकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या बैठकीला नळदुर्ग पोलिस स्टेशनचे सपोनि सुधीर मोटे, तायवाडे, पोलीस कॉन्स्टेबल पोतदार, पवार, नळदुर्ग आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री जानराव, महावितरणचे कनिष्ठ अभियंता गायकवाड, नळदुर्ग यात्रा कमिटीचे अध्यक्ष सुधीर सूर्यकांत पाटील, शेठगार बाहुबली, स्वामी दयानंद, विलास पुदाले, नगरसेवक आप्पा धरणे, नितीन कासार, संतोष पुदाले, सरदार शिंग ठाकुर, पद्माकर घोडके,संजय बताले सर्व नळदुर्ग चे मानकरी तसेच अणदूर यात्रा कमिटीचे अध्यक्ष मनोज भीमाशंकर मुळे, श्रीमंत मुळे गुरुजी, दिनकरराव कुलकर्णी, महादेव मुळे, कल्याणी मुळे, प्रवीण घोडके, साहेबराव घुगे, गुरु मिटकरी, म्हाळाप्पा गळाकाटे, अणदूर पोलीस पाटील जावेद शेख, सर्व मानकरी मैलारपुर (नळदुर्ग) खंडोबा मंदिर समितीचे माजी अध्यक्ष प्रकाश मोकाशे,उपाध्यक्ष अविनाश मोकाशे,सदस्य दिपक अशोक मोकाशे,अमोल रमेश मोकाशे,सुदर्शन मोकाशे,नवनाथ ढोबळे,दिवाकर मोकाशे,भगवान शिवराम मोकाशे,सदानंद येळकोट, शाहुराज मोकाशे तसेच नळदुर्गचे सर्व पत्रकार उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा