Breaking

मंगळवार, ४ जानेवारी, २०२२

नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत ४५जण रिंगणातफक्त जागा-21,पहा तुल्यबळ लढाई


नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत ४५जण रिंगणात

फक्त जागा-21,पहा तुल्यबळ लढाई

श्रीगोंदा:-नितीन रोही

 सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४जानेवारी ला माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यामध्ये २१ जागेसाठी ४५ जण  रिंगणात आहेत त्यामुळे होणारी लढत ही दुरंगी होणार असून यामध्ये कोण बाजी मारणार याकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष राहणार आहे. तालुक्यातील दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर सर्व सभासदांचे लक्ष लागून राहिले होते की नागवडे कारखान्याची निवडणूकही बिनविरोध होते की काय परंतु आज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता त्यामध्ये आज २१जागेसाठी४५ तब्बल उमेदवारी अर्ज राहिले आहेत यामध्ये केशव  मगर यांच्या पॅनल मध्ये सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती मधून शिंदे जिजाबापू, भोस बापूसाहेब ,पाचपुते भगवानराव ,पाचपुते वैभव,फराटे महादेव, थिटे देविदास, शेलार अण्णासाहेब, रायकर तुळशीराम, काकडे विकास, रसाळ लक्ष्मण, गव्हाणे हरिश्चंद्र, पवार रोहिदास, मगर केशव निवृत्ती,भोईटे शांताराम, कुरुमकर हरिभाऊ यांच्या सह उस उत्पादक सहकारी संस्था आणि बिगर उत्पादक व पणन संस्थे प्रवीणकुमार नहाटा,अनुसूचित जाती जमाती मधून सोनवणे राजेंद्र जगन्नाथ महिला प्रतिनिधी मधून पाचपुते प्रतिभा बबनराव, काळाने सुरेखा सुभाष इतर मागासवर्गीय मधून बोरुडे उमेश किसनराव तसेच भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग मधून राहीज अशोक यांना उमेदवारी देण्यात आली असून यांना चिन्ह वाटपही करण्यात आलेले आहेत तसेच राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या पॅनल मध्ये शिंदे सुभाष,भोस बाबासाहेब , नागवडे राजेंद्र शिवाजीराव , पाचपुते राकेश,घाडगे श्रीनिवास,जगताप शरद, काकडे दत्तात्रय,रायकर लक्ष्मन,लबडे भीमराव,नेटके भाऊसाहेब,दरेकर प्रशांत,रसाळ सुरेश,जंगले विठ्ठल,शीपलकर प्रशांत,गिरमकर विश्वनाथ,नागवडे राजेंद्र शिवाजीराव,जगताप बंडू नामदेव,मंदाकिनी मारुती पाचपुते,औटी मेघा संदीप,हिरवे सावता लक्ष्मण,बरकडे भाऊसाहेब बाबा आणि अपक्ष उमेदवार मध्ये औटी दादाराम लक्ष्मण ,काटे बापू गुलाब ,मगर योगेश केशव,राहिंज धोंडिबा बापू असे एकूण ४५ उमेदवार रिंगणात उभे आहेत त्यामुळे होणारी निवडणूक दुरंगी होणार असून सर्वांच्या प्रतिष्ठेची हि निवडणूक बनली आहे त्यामुळे जोरदार रस्सीखेच होणार असल्याचे चित्र आता निर्माण झाले आहे.

फोटो-साखर कारखाना


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा