Breaking

सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

तुळजापूर येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न*


*तुळजापूर येथे ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न*


तिर्थ क्षेत्र तुळजापूर शहरासह तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील चोरीला व शहरातील दरोडा पडला तर ग्राम सुरक्षा यंत्रणेखाली काही क्षणात पोलिस ताब्यात घेणार यामुळे दरोडा, चोरीला आळा बसणार हे मात्र नक्कच मागील काही दिवसा खाली श्री तुळजाभवानी मंदिरा जवळून क्लोजर एम.एच. २२ - यू - ७६७० हि चार चाकी वहाण चोरी गेले होते.तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आजिनाथ काशीद यांनी वैराग पोलीस स्टेशन हद्दीत यासंदर्भात संपर्क साधला ते ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून दि. २० डिसेंबर २०२१ रोजी सोलापूर येथील पोलीसप्रशासनास यश आले काही तासात गाडी सापडली
संकटसमयी स्वत;च्या मोबाईलवरून सर्व गावक-यांना एकाच वेळी कॉलच्या माध्यमातुन सुचना देणे , सावध करणे किंवा मदतीला बोलावण्यासाठी उपयुक्त यंत्रणा पोलिस ठाणे व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विदयमाने गावात होणा-या विविध गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याबाबत तुळजापूर पोलिस ठाण्याच्या वतीने ग्राम सुरक्षा यंत्रणेचे कार्यशाळा सोमवार रोजी दि .२७ डिसेंबर रोजी संपन्न  झाले . 

ग्राम सुरक्षा यंत्रणा , उस्मानाबाद जिल्हा पोलिस दल व जिल्हा परिषद उस्मानाबाद यांचा संयुक्त विदयमाने आयोजित या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर  ग्राम सुरक्षा यंञाणा  संचालक डि. के गोर्डे ,  उपविभागीय पोलिस आधिकारी सई भोरे - पाटील , पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद, ए. पी. आय. सुशिल चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक कवीता मुसळे, पुजारी मंडळाचे सज्जन साळुंके व्यपिठावर उपस्थित होते.
यावळी ए.एस. आय रवि शिंदे,  पोलिस अतुल यादव, मिटके, कमल राऊत, राठोड, रवि भागवत ,बाळासाहेब देवगुने तसेच पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येणे आदि उपस्थित होते. 

तुळजापूर पोलीस ठाण्याच्या हाद्दीतील १०८  गावात ग्राम सुरक्षा  यंत्रणा  प्रभावीपणे राबविण्यासाठी तथा ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी सोमवारी तुळजापूर पोलीस ठाणे अंतर्गत  गावातील पोलीस पाटील,  सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पोलीस कर्मचारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासाठी  ग्राम सुरक्षा यंत्रणेचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. 
ग्राम सुरक्षा यंत्रणेचे संचालक डी.के. गोर्डे यांनी उपस्थितांना यंत्रणेचे प्रात्यक्षिक करून दाखवले. 

डि.के. गोर्डे उपस्थितांना मार्गदर्शन करताना  म्हणाले की, पुणे, नाशिक, नगर, सोलापूर अशा बारासे गावात यंत्रना राबवली आहे तसेच मागील काही वर्षात जिल्ह्यातील गावे ग्राम सुरक्षा यंत्रणेत सहभागी झाली असून सर्व नागरिक ग्राम सुरक्षा यंत्रना ३६ लाख लोख राबवी तात तर ग्राम सुरक्षा यंत्रना ॲपद्वारेआपापले मोबाईल नंबर नोंदवून यंत्रणा वापरत असल्याची माहिती देऊन ग्रामीण भागात सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्राम सुरक्षा यंत्रणा प्रभावी ठरत असल्याचे सांगितले.

यामुळे चोरी,दरोडा यासारख्या घटनांमध्ये तात्काळ मदत मिळणार आहे.चोर,दरोडेखोर जागेवर जेरबंद करण्यास ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून संकट काळात स्वतःच्या मोबाईलवरुन  सर्व गावकऱ्यांना एकाच वेळी कॉलच्या माध्यमातून सुचना देणे, सावध करणे, किंवा मदतीला बोलावण्यासाठी हि यंत्रणा उपयुक्त असून पोलीस स्टेशन व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्या गावात मालमत्तेसंदर्भात व शरीराविरुध्द होणारे गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चोरी, दरोडे, आग, जळीतांच्या, आपत्कालीन परिस्थितीत, ग्रामसभा, सरकारी सुचना आदी घटनांमध्ये सर्वांना एकाचवेळी  सुचना देण्यासाठी सर्वांसाठी वापरता येणारा टोल फ्री नंबर 18002703600 वर नोंदी केलेल्या नागरिकाने आपत्ती काळात फोन केल्यास त्याचा आवाज परिसरातील अनेक नागरिकांना त्वरीत मोबाईलवर ऐकू जातो.परिसरातील नागरिकांना घटना घडत असतानाच घटनेची माहिती मिळाल्याने तातडीने मदत करणे व नुकसान टाळणे शक्य होते.
ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे घटनाग्रस्त नागरिकांना परिसरातील नागरिकांची तातडीने मदत मिळणे,गावातील कार्यक्रम,घटना विनाविलंब नागरीकांना एकाच वेळी कळणे, अफवांना आळा घालणे, प्रशासनाला नागरिकांशी जलद संवाद साधता येणे, पोलीस यंत्रणेस कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळणे असे फायदे असल्याचे सांगून  गावासाठी यंत्रणा सुरु करणे व सहभागी होण्यासाठी पध्दत समजावून सांगितले. या प्रात्यक्षिकास उपस्थितानी प्रतिसाद दिला.याप्रसंगी पोलिस उपविभागीय आधिकारी सई भोरे - पाटील व पोलिस निरिक्षक अजिनाथ काशीद यानीही  मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रतावीक ग्राम सुरक्षा यंत्रना अधिकारी यांनी केले तर  सुञसंचालन व आभार पोलिस पाटील विकास पाटील, अमिर शेख, सज्जन साळुंके यानी मानले.

यावेळी ग्राम सुरक्षा यंत्रणा विधायक अधिकारी उत्तम सुतार, आदिसह परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी तुळजापूर शहरातील सर्व पत्रकार  आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तुळजापूर पोलीसांनी परिश्रम घेतले.


प्रतिनिधि रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा