भटक्या विमुक्त जाती जमाती व आर्थीक दृष्टीने दुर्बल असलेल्या १२५ विद्यार्थ्यांना अग्नीपंख फौंडेशनची मद्दत.
श्रीगोंदा-नितीन रोही
श्रीगोंदा फॅक्टरी येथील इंदीरा गांधी विद्या निकेतन मधील भटक्या विमुक्त जाती जमाती व आर्थीक दृष्टीने दुर्बल असलेल्या १२५ विद्यार्थ्यांना वह्याची भेट अग्नीपंख फौंडेशनच्या विद्यार्थी सहाय्यता निधीतून देण्यात आली वह्याची भेट मिळताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्याचे हास्य उमलले.
वह्याचे वाटप गटशिक्षणाधिकारी अनिलराव शिंदे प्रा संजय लाकुडझोडे महेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय गावडे बी बी गोरे डॉ अरुण रोडे यांचे हस्ते करण्यात आले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोहीदास बोरुडे होते. यावेळी वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांचे स्मरणार्थ वृक्षारोपण करण्यात आले.
गटशिक्षणाधिकारी अनिल शिंदे म्हणाले कि भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या शाळा विद्यार्थी खेळाडू व उपेक्षितांसाठी चांगले काम चालविले आहे.
प्रा संजय लाकुडझोडे म्हणाले कि राष्ट्रीय पातळीवर पदके मिळविणाऱ्या विद्यार्थांना निती कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून प्रत्येकी पाच हजाराची मदत करण्यात येईल.
यावेळी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक दिलीपराव काटे मुख्याध्यापक शिवाजीराव गवळी यांनी विचार मांडले
प्रास्ताविक बाळासाहेब जठार यांनी केले
यावेळी सरपंच शुभांगी सुर्यवंशी शिवदास शिंदे बबनराव गोरे मधुकर जगताप विजय लंके मधुकर काळाणे राहुल साळवे सतिश लगड अभय गुंड आदि उपस्थित होते.
सुत्रसंचालन शरद धोत्रे यांनी
आभार अग्नीपंखच्या उपाध्यक्ष शुभांगी लगड यांनी मानले.
फोटो,


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा