*तुळजाभवानी महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा*
तुळजापूर,दि.६, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या हस्ते प्रतिमा करुन अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी मराठी विभागप्रमुख डॉ एस एम देशमुख यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन व कार्याविषयक उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.सदर प्रसंगी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व उपस्थितांनी सॅनिटायजर आणि मास्कचा यथायोग्य वापर केला होता.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा