Breaking

शनिवार, २७ नोव्हेंबर, २०२१

दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चो-या करणारा सराईत आरोपी



दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, चो-या करणारा सराईत आरोपीी


 श्रीगोंदा पोलीसांच्या ताब्यात....


श्रीगोंदा-नितीन रोही,

दि. 26/11/2021 रोजी पोनि श्री रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील सराईत आरोपी नामे विजय राजु काळे वय 22 वर्षे, रा. उंबरगे ता. बाशी जि. सोलापुर हा लिंपनगाव बस स्टॅण्डवर संशयित रित्या फिरत आहे. त्याबाबत त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व कर्मचारी यांना सुचना देवून ताब्यात घेण्याच्या सुचना दिल्या त्यावरुन सदर आरोपीस ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यात एक धारधार कोयता मिळुन आला असुन त्याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.रजि. नं.821/2021 भारतीय हत्यार कायदा 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सदर गुन्ह्याचे अनुशंगाने आरोपीकडे कसुन चौकशी केली असता त्याचेवर अकलुज, बार्शी, इंदापुर, बारामती, मोहोळ पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असुन तो खालील गुन्ह्यांमध्ये फरार आहे.

1) अकलुज पोलीस स्टेशन गु.रजि. नं. 710/2021 भा.द.वि.क.394,511,34

2) अकलुज पोलीस स्टेशन गु.रजि. नं.268/2021 भा.द.वि.क.457,380

3) बार्शी शहर पोलीस स्टेशन गु. रजि. नं.58/2021 भा.द.वि.क.395.

4) इंदापुर पोलीस स्टेशन गु.रजि. नं. 441 / 2019 भा.द.वि.क.379

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अण्णासाहेब जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रामराव ढिकले, सपोनि दिलीप तेजनकर, स.फो अंकुश ढवळे, पोना गोकुळ इंगवले, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ दादा टाके, पोकॉ अमोल कोतकर यांनी केली आहे.


फोटो,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा