Breaking

रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

रणजितसिंह भैय्या शिंदे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या माढा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सन्मान



रणजितसिंह भैय्या शिंदे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या माढा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सन्मान



भिमानगर/ प्रतिनिधी-पाटील सर यांच्याकडून

जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह बबनराव शिंदे यांची माढा तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रणजितसिंह शिंदे यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह भैय्या शिंदे म्हणाले की संजय गांधी निराधार योजनेला आपण अजून गतीमान करणार असून या योजनेचा लाभ गरजवतांना मिळवून दिला जाईल.तसेच जेष्ठ नागरिकांसाठी गावोगावी जाऊन प्रकरणे तयार करून जास्तीत जास्त नागरिकांना लाभ देण्यासाठी आपला प्रयत्न राहील असे जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यावेळी म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढा तालुका उपाध्यक्ष प्रदीपराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सचिन लोंढे पाटील,ऍड मंगेश देशमुख, सचिन थोरात,भारत काळे देशमुख,व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक एस एन डिग्रजे,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा