*सन २०२०-२०२१, या हंगामातील ऊस बिल व कारखान्याकडे अनामत रक्कम जमा असलेले, परत मिळावी,या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लोहारा तहसीलदार यांना निवेदन*
दिनांक, १३ ऑक्टोबर २०२१ रोजी, विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने लोहारा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे, या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, सर्व शेतकरी दिनांक १२ ऑक्टोंबर २०२१ पासून बेमुदत आंदोलन सुरू केले आहे, परंतु सदरील कारखाना चेअरमन व संचालक मंडळ आमच्या मागण्यास दाद देत नाहीत, तरी आमच्या मागण्या,१) घाण पाण्याचे व्यवस्थापन करावे,२) कारखान्याच्या राखेमुळे पिकावर होणारे परिणाम, ३) हायवे वर येणारा बगॅस धूळ बंद व्हावा,या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या, अन्यथा या सर्व नुकसानीस प्रशासन जबाबदार राहील,यापुढील आंदोलनात माजी खासदार राजू शेट्टी हे स्वतः उतरतील याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, लोहारा तालुका अध्यक्ष सुनील गरड, रामेश्वर सुर्यवंशी, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा