राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालये सुरू करा- वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेची मागणी
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
राज्यातील शाळा महाविद्यालय लवकरात लवकर सुरू करा अशी मागणी वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी नांदेड यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली
कोरोना महामारीने जगभरातील जनतेला त्रस्त केले आहे. सर्वच बाबतीतील व्यवहार ठप्प पडलेले होते. माणूस वाचवण्यासाठी लॉक डाऊन सारखे पर्याय वापरले गेले. त्यातून मध्यंतरी सर्वच जनजीवन बाधित झाले होते. कोरोनाचे नियम म्हणून उद्योग बंद करण्यात आले व शाळाही बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता कोरोना विरुद्धचे अनेक पर्याय साधने उपलब्ध झालेली आहेत. लसीकरण जोरात सुरू आहे. राज्यातील सर्व राजकीय-सांस्कृतिक सभा, कार्यक्रम, संमेलने, बाजार, बस सेवा, रेल्वे, व इतर वाहतूक सेवा सुरळीतपणे सुरू आहेत. परंतु मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे व कधीच न भरून निघणारे शैक्षणिक नुकसान होत आहे.
शाळा व महाविद्यालया मधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे लसीकरण झालेले आहे. राज्यात 01 लाख 06 हजार 668 शाळांमधून 21 लाख 74 हजार 519 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आतापर्यंत शाळा बंद असल्यामुळे शिक्षणाचे ऑनलाईन सारखे प्रयोग राबवण्यात आलेले आहेत. मात्र इतक्या मोठ्या संख्येने असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांकडे मोबाईल असेलच असे नाही. तसेच ऑनलाईन शिक्षणाला मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप आतोनात नुकसान झालेले आहे.
विद्यार्थ्यांचे अधिक शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून लवकरात लवकर शाळा सुरू कराव्या अशी मागणी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदचे जिल्हाध्यक्ष इंजी. प्रविण जाधव यांनी एका निवेदाद्वारे केली त्यावेळी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे जिल्हा सचिव गोविंद दुगावे अंकुश पाटिल कोल्हे सुरज पाटील आलेगावकर संतोष कदम आनंद कदम हे उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा